मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SIP मध्ये गुंतवणूक आता होणार आणखी सोपी; RBIच्या घोषणेमुळे प्रक्रिया झटपट

SIP मध्ये गुंतवणूक आता होणार आणखी सोपी; RBIच्या घोषणेमुळे प्रक्रिया झटपट

तुम्ही SIP च्या (Systematic Investment Plan) माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

तुम्ही SIP च्या (Systematic Investment Plan) माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

तुम्ही SIP च्या (Systematic Investment Plan) माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

नवी दिल्ली, 4 जून: तुम्ही SIP च्या (Systematic Investment Plan) माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. मात्र आता तुम्ही अगदी कमी वेळेत रजिस्ट्रेशन करू शकाल. एसआयपी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं घोषणा केली आहे, की NACHची सेवा आता आठवड्याचे सातही दिवस 24 तास सुरू राहील. एनएसीएचचं काम यापूर्वी केवळ 'वर्किंग डे'लाच चालायचं. 'टीव्ही नाइन हिंदी'ने या संदर्भातलं वृत्त दिलंय.

आरबीआयच्या (RBI) या नवीन घोषणेमुळे NACHची सेवा नेहमीच सुरू असेल. त्यामुळे एसआयपी रजिस्ट्रेशनसाठी (SIP registration)लागणारा वेळ कमी होईल. याआधी एनएसीएचच्या माध्यमातून एसआयपी रजिस्ट्रेशन करण्यासाठी 2-3 आठवड्यांचा कालावधी लागायचा. मात्र आता नवीन नियमांमुळे कमी वेळ लागण्याची शक्यता आहे. आधी इन्व्हेस्टर बँकेच्या कामकाजावर याची वेळ निश्चित व्हायची. पण मात्र ही प्रक्रिया आता झपाट्याने होईल, अशी आशा आहे.

'लाइव्ह मिंट'च्या एका रिपोर्टमध्ये म्युच्युअल फंड युटिलिटीजचे सीईओ गणेश राम यांनी म्हटलंय, की ‘NACH पूर्ण वेळ काम करणार असल्यानं एसआयपी रजिस्ट्रेशनचा वेळ कमी होईल. तसेच गुंतवणुकीचा अनुभवही आधीपेक्षा वेगळा असेल.’

हेही वाचा- ''...तर मग आमच्या काँग्रेसला शुभेच्छा'', संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

NACH काय आहे?

NACH ही एक बँक सर्व्हिस असून, याच्या माध्यमातून कंपन्या आणि सामान्य व्यक्ती त्यांचे महिन्याचे प्रत्येक पेमेंट सहज आणि कोणत्याही टेंशनशिवाय पूर्ण करतात. एनएसीएचच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पेमेंट केलं जातं. यामध्ये पगार देणं, भागधारकांना डिव्हिडंड देणं, व्याजाची परतफेड, पेन्शन ट्रान्सफर करणं याचा समावेश आहे. याशिवाय इलेक्ट्रिसिटी, फोन आणि पाण्याची बिलं भरण्याची प्रक्रियाही एनएसीएचच्या माध्यमातून पूर्ण होते.

एनएसीएच ही गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडमध्ये एकरकमी किंवा एसआयपीची गुंतवणूक करण्यास परवानगी देणारी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. आपल्या बँक खात्यातून ठरावीक तारखेला, ठरलेली रक्कम म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे भरली जावी अशा सूचना आपण बँकेला दिलेल्या असतात. हे ऑटो-डेबिटचं काम एनएसीएचद्वारे होतं.

हेही वाचा- संभाजीराजे छत्रपती यांचं नवं ट्वीट; शेअर केला 'हा' ऐतिहासिक फोटो

एनएसीएच मँडेट दोन प्रकारचे असतात. एक प्रकार असतो एनएसीएच डेबिट, ज्याचा वापर फोनचं बिल भरणं, म्युच्युअल फंडात एसआयपी आणि वीजबिल भरण्यासाठी केला जातो. दुसरा प्रकार म्हणजे एनएसीएच क्रेडिट. एनएसीएच क्रेडिटचा वापर सॅलरी, डिव्हिडंड देण्यासाठी केला जातो. एनएसीएच मँडेट म्हणजे तुमच्या खात्यातून पैसे वळते करण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी दिली जाणारी परवानगी असते.

First published:

Tags: Investment, Money, Savings and investments