मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RBI च्या रेपो रेटचा तुमच्या FD वर होणार परिणाम, किती होणार फायदा?

RBI च्या रेपो रेटचा तुमच्या FD वर होणार परिणाम, किती होणार फायदा?

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI ) रेपो रेटमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे होमलोनमध्ये दिलासा मिळाला नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI ) रेपो रेटमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे होमलोनमध्ये दिलासा मिळाला नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI ) रेपो रेटमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे होमलोनमध्ये दिलासा मिळाला नाही.

  • Published by:  Arti Kulkarni

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI ) रेपो रेटमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे होमलोनमध्ये दिलासा मिळाला नाही. त्याचबरोबर याचा बँकांमधल्या फिक्स डिपॉझिटवरही परिणाम होणार आहे.सध्याचा रेपो रेट 5.15 टक्के इतका आहे. आता हाच रेपो रेट पुढे कायम राहणार आहे. तसंच, रिव्हर्स रेपो रेट 4.90 टक्क्यांवर कायम असणार आहे. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात न केल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे.

याआधी 5 वेळा कपात

RBI ने याआधी सलग 5 वेळा व्याजदरात कपात केली होती. डिसेंबर 2019 मध्ये मात्र व्याजदरात बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर SBI ने ठराविक काळासाठी FD वरचे व्याजदर 15 बेसिक पॉइंटने कमी केले. 10 जानेवारी 2020 पासून SBI च्या एक वर्षाच्या एफडीवरचे व्याजदर 6.10 टक्के आहे. नोव्हेंबर 2029 मध्ये हे व्याजदर 6. 25 टक्के होते. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवर 6.60 टक्के व्याजदर आहे.

(हेही वाचा : जानेवारी महिन्यात त्याने दररोज कमावले 3 हजार कोटी रुपये, बेजोसलासुद्धा जमलं नाही)

ज्येष्ठ नागरिकांवर जास्त परिणाम

एफडीचे व्याजदर घटल्याने सगळ्यात जास्त परिणाम ज्येष्ठ नागरिकांवर होतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी हा इनकमचा चांगला मार्ग आहे. एफडीचे व्याजदर घटल्याने पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना हा ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला पर्याय होऊ शकतो.

GDP 5 टक्के राहण्याचा अंदाज

रिझर्व्ह बँकेने 2019- 2020 मध्ये GDP म्हणजेच आर्थिक विकास दर 5 टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. 2020 - 21 मध्ये हा दर 6 टक्के होईल, अशी शक्यता आहे.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली द्विमाही पतधोरण जाहीर करण्यात आलं. यावेळी पतधोरणात रेपो रेटमध्ये कोणताच बदल न करता कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

=========================================================================

First published:

Tags: Money, Rbi