मराठी बातम्या /बातम्या /मनी /बँकेच्या लॉकरमधील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार का?

बँकेच्या लॉकरमधील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार का?

RBI च्या सूचनांचे पालन करून, बँकांनी या वर्षापासून नवीन लॉकर (RBI New Rules on Bank Locker) कराराचे स्वरूप देखील जारी केले आहे.

RBI च्या सूचनांचे पालन करून, बँकांनी या वर्षापासून नवीन लॉकर (RBI New Rules on Bank Locker) कराराचे स्वरूप देखील जारी केले आहे.

RBI च्या सूचनांचे पालन करून, बँकांनी या वर्षापासून नवीन लॉकर (RBI New Rules on Bank Locker) कराराचे स्वरूप देखील जारी केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सोनं नाणं असो किंवा दागिने असो चोरांपासून वाचवण्यासाठी त्याला सुरक्षित ठिकाणी म्हणजे लॉकरमध्ये ठेवलं जातं. आता तसंच बँकेत देखील पैसे सुरक्षित राहावेत म्हणून लॉकरमध्ये ठेवले जातात. तुम्हाला दागिने देखील बँकेतील लॉकरमध्ये ठेवता येतात. पण समजा बँकेतच दरोडा पडला किंवा आग लागली. तुमचे पैसे आणि दागिने चोरीला गेले तर मग तुमची नुकसान भरपाई बँक देणार का? याबाबत RBI चा नियम काय सांगतो जाणून घेऊया.

तुमच्या लॉकरचं जर नुकसान झालं तर ती जबाबदारी बँक झटकू शकत नाही. त्याला बँकेतील कर्मचारी देखील जबाबदार असतात. सुप्रीम कोर्टानं RBI ला बँक लॉकरच्या सुरक्षेबाबत पावले उचलण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने लॉकरच्या सुरक्षेबाबत नवीन नियम जारी केले.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या 5 स्किम देतात जबरदस्त रिटर्न्स, लगेच करा गुंतवणूक!

यावर्षी १ जानेवारीपासून लागू झाले आहेत. नवीन नियमांनुसार, बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या ग्राहकाच्या कोणत्याही मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाल्यास बँक व्यवस्थापन जबाबदार असेल आणि त्यांना लॉकरच्या 100 पट भाडे ग्राहकांना द्यावे लागेल.

नव्या नियमानुसार लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे आग, चोरी, दरोडा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे नुकसान झालं असेल आणि बँकेने यात निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाले आहे. घटना घडली, तर ती ग्राहकाला भरपाई द्यावी लागेल. तो कोणत्याही परिस्थितीत त्याच्या जबाबदारीपासून पळ काढू शकणार नाही.

Women Empowerment: नोकरीतून मिळायचे 5 हजार आता चालवतेय लाखोंचा कारभार

RBI च्या सूचनांचे पालन करून, बँकांनी या वर्षापासून नवीन लॉकर (RBI New Rules on Bank Locker) कराराचे स्वरूप देखील जारी केले आहे. लॉकर सुविधेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांना आणि बँकांना या करारावर स्वाक्षरी करावी लागेल.

First published:
top videos

    Tags: Rbi, Rbi latest news