RBI ची खास गिफ्ट! आता झीरो बॅलन्स असलेल्या खातेधारकांना मिळणार 'या' सुविधा

RBI, Zero Balance - झीरो बॅलन्स खातेधारकांसाठी आता नव्या सुविधा सुरू होणार आहेत. त्याबद्दल घ्या जाणून

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 07:03 PM IST

RBI ची खास गिफ्ट! आता झीरो बॅलन्स असलेल्या खातेधारकांना मिळणार 'या' सुविधा

मुंबई, 06 ऑगस्ट : भारतीय रिझर्व्ह बँकेनं बेसिक सेव्हिंग डिपाॅझिट (BSBD) अकाउंट असलेल्यांना खास गिफ्ट दिलंय. RBI  एक गाइडलाइन घेऊन आलीय. ते नियम सर्व प्रायमरी सहकारी बँका, सर्व राज्य किंवा केंद्रीय सहकारी बँकांना पाळावे लागतील. खातेधारकांना 1 सप्टेंबरपासून याचा फायदा होईल. BSBD अकाउंट हे झीरो बॅलन्स अकाउंट आहे. यात खातेधारक कितीही पैसे ठेवू शकतात. याला दंड लागत नाही. कुठल्याही बँकेत झीरो बॅलन्स अकाउंट उघडू शकता.

RBIचा निर्णय

RBI नं BSBD अकाउंटशी संबंधित सेवांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय बँकांना BSBD अकाउंटमध्ये काही बेसिक सुविधा द्यायला सांगितलंय.

खूशखबर, सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण, 'हे' आहेत मंगळवारचे भाव

RBI नं आपल्या आदेशात म्हटलंय की BSBD अकाउंटला सर्वांसाठी सामान्य बँकिंग सर्विस समजली जाईल.

Loading...

ज्यांचे अकाउंटमध्ये अजिबात पैसे शिल्लक राहत नाहीत त्यांच्यासाठी हे खातं उपयोगी आहे.

1 सप्टेंबरपासून मिळतील या सुविधा

झीरो बॅलन्स खातेधारक आता बँकेच्या शाखेशिवाय एटीएम आणि कॅश डिपाॅझिट मशीनमध्ये पैसे जमा करू शकतात.

खातेधारकाच्या खात्यात पैसे फंड ट्रान्सफर किंवा युपीआयच्या मदतीनं जमा होऊ शकतात. महिन्यातून कितीही वेळा ट्रान्झॅक्शन करता येतं.

तुम्हालाही मिळू शकते Netflix मध्ये नोकरीची संधी, 'या' उमेदवाराला मिळेल पसंती

लोक महिन्यात एटीएमसह चार वेळा पैसे काढू शकतात.

खातेधारकांना एटीएमसह डेबिट कार्ड मिळेल.

बँक अशा ग्राहकांना चेक बुकही देईल.

अमेरिकेनं चीनच्या विरोधात घेतला 29 वर्षातला मोठा निर्णय

बँक ग्राहकांना चेक बुक सुविधा दिल्यावर त्यांच्या खात्याचं रूपांतर बचत खात्यात करू शकत नाही.

तुमच्याकडे सेव्हिंग अकाउंट आहे आणि तुम्हाला झीरो बॅलन्स अकाउंट उघडायचं असेल तर 30 दिवसाच्या आत सेव्हिंग अकाउंट बंद करावं लागेल. शिवाय तुमच्याकडे झीरो बॅलन्स अकाउंट नाही, हे बँकेला लिहून द्यावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rbi
First Published: Aug 6, 2019 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...