नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) द्वैमासिक आर्थिक धोरण समितीच्या बैठकीमध्ये (MPC) व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सलग चौथ्यांदा आरबीआयने धोरणात्मक व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे आता रेपो रेट (Repo Rate) 4 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) 3.35 टक्क्यांवर असणार आहे. रेपो रेटमध्ये बदल न झाल्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या लोनवरील ईएमआय कमी होण्याची शक्यता धूसर आहे. जाणून घ्या आरबीआयच्या या निर्णयाचा नेमका काय परिणाम होईल?
1. एक्सटर्नल बेंचमार्कशी लिंक असणारे होम लोन
ज्या लोकांचे गृहकर्ज एक्सटर्नल बेंचमार्कशी (External Benchmark) लिंक आहे, त्यांच्या EMI मध्ये सध्या कोणताही बदल होणार नाही आहे. दरम्यान बँका त्यांच्याकडून मार्जिन कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. दुसरीकडे बँकेने तुमच्या खात्यावर रिस्क प्रीमियम वाढवला तर गृहकर्जाच्या रकमेवर ईएमआय वाढू शकतो.
2. MCLR एमसीएलआरशी लिंक असणारे कर्ज
बँकेचा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR), कॉस्ट ऑफ फंड्ससारखा इन्टर्नल फॅक्टर आणि रेपो रेट सारख्या एक्सटर्नल फॅक्टरमुळे देखील प्रभावित होतो. साधारणत: एमसीएलआरशी लिंक असणाऱ्या होम लोनच्या रिसेटचा कालावधी 6 महिने किंवा एक वर्ष असतो. अशावेळी तुमच्या बँकेने एमसीएलआर येणाऱ्या काळात कमी केला तर तुमचा EMI कमी होऊ शकतो. सप्टेंबर 2020 मध्ये आरबीआयने ट्वीट करत अशी माहिती दिली होती की, MCLR रिसेट करण्याचा कालावधी एका वर्षावरून कमी करून सहा महिने करण्यात आला आहे. या धोरणाचा देखील ग्राहकांवर परिणाम दिसून येईल.
(हे वाचा-एका व्यक्तीच्या PF खात्यामध्ये 102 कोटी रुपये! आश्चर्यकारक माहिती आली समोर)
3. बेस रेट किंवा BPLR शी लिंक असणारे लोन
ज्या लोकांचे कर्ज बेस रेट किंवा बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेटशी लिंक आहे, त्यांना एक्सटर्नल बेंचमार्कशी लिंक करण्याबाबत विचार करायला हवा. फायनान्शिअल प्लॅनर्स आणि इंडस्ट्री एक्सपर्ट्सच्या मते, आरबीआय द्वारे कोणत्याही पॉलिसीत बदल झाला, तर यावर त्वरित बदल पाहायला मिळतो. 10 डिसेंबर 2020 पासून एसबीआयचा बीपीएलआर 12.05 टक्के आणि बेस रेट 7.30 टक्के आहे. रेपो रेटशी लिंक्ड असणाऱ्या कर्जाचा व्याजदर 7 टक्क्यापासून सुरू होतो.
(हे वाचा-Petrol Price: पुण्यामध्ये पेट्रोलचे दर विक्रमी स्तरावर! 93 रुपयांनी होतेय विक्री)
4. कर्ज घेण्याची योग्य वेळ
जर एखाद्या व्यक्तीने येणाऱ्या काळात कर्ज घेण्याची तयारी केली असेल तर त्यांच्यासाठी ही सर्वोत्कृष्ट वेळ आहे कारण व्याजदर खूप कमी आहेत. असे असले तरीही सध्याच्या साथीच्या काळात इतर प्रकारच्या घटकांचे देखील मूल्यांकन केले पाहिजे. याशिवाय सर्वात कमी दराने कर्ज मिळण्यासाठी बँकांचे मार्जिन आणि त्यांचे रिस्क प्रीमियम देखील माहित असणे आवश्यक आहे. तुम्हाला हे देखील लक्षात घ्यावे लागेल की सर्व बँकांनी एक्सटर्नल बेंचमार्क म्हणून रेपो रेट निवडलेला नाही. काही बँक कर्जाचे व्याज दर डिपॉझिट रेट सर्टिफिकेट, ट्रेजरी बिल इ. शी लिंक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rbi