Home /News /money /

बदलले आर्थिक व्यवहारांशी संबंधित नियम, RBI च्या बैठकीतील या 10 मुद्द्यांचा तुमच्यावर होणार थेट परिणाम

बदलले आर्थिक व्यवहारांशी संबंधित नियम, RBI च्या बैठकीतील या 10 मुद्द्यांचा तुमच्यावर होणार थेट परिणाम

रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India RBI) मॉनटरी पॉलिसी बैठकीतील निर्णय आज जाहीर झाले आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी व्याजदर, आरटीजीएबाबत अनेक निर्णयांची माहिती दिली.

    नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India RBI) मॉनटरी पॉलिसी बैठकीतील निर्णय आज जाहीर झाले आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी व्याजदर, आरटीजीएबाबत अनेक निर्णयांची माहिती दिली. जाणून घेऊया या बैठकीतील निर्णयांशी संबधित तुमच्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या 10 महत्त्वाच्या बाबी. 1. व्याजदरांत कोणताही बदल न करण्याचा आणि रेपो रेट 4 टक्के ठेवण्याचा आरबीआयने निर्णय घेतला आहे. 2. एमपीसीने सर्वानुमते हा निर्णय घेतला असून रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्केच असेल. 3. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, ‘ ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारत आहे. या आर्थिक वर्षात धान्याचं विक्रमी उत्पादन झालं आहे. प्रवासी मजूर पुन्हा एकदा शहरांत परतलेत.’ (हे वाचा-कर्जावरील EMI भरणाऱ्यांना दिलासा, RBI च्या पॉलिसीत रेपो रेटमध्ये बदलाव नाही) 4. दास असे म्हणाले की, ऑनलाइन कॉमर्समध्ये चलती आहे. लोक ऑफिसमध्ये जाऊन काम करत आहेत. 2021 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत महागाई कमी होईल अशी अपेक्षा आहे. 5. दास म्हणाले, ‘ अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. आम्ही उज्ज्वल भविष्याचा विचार करत आहोत. सर्वच क्षेत्रांत परिस्थिती सुधारत असून आर्थिक विकासाची आशा वाटते आहे. 6. रब्बीचं पिक चांगल्या प्रमाणात आलं आहे. महामारीच्या संकटाचा सामना केल्यानंतर आता कोव्हिडऐवजी आर्थिक सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. 7. रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे की, डिसेंबर 2020 पासून नागरिक RTGS ही ऑनलाइन पैसे पाठवण्याची सुविधा 24x7 वापरू शकतील. सध्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेतच RTGS सुविधा वापरता येते. (हे वाचा-व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही, मार्च तिमाहीत GDP सकारात्मक होईल- RBI गव्हर्नर) 8. दास म्हणाले, ‘ 2021 या आर्थिक वर्षात 9.5 टक्के मंदी येऊ शकते. सप्टेंबर महिन्यात PMI वाढून 56.9 झाला आहे. जानेवारी 2012 नंतर हा सर्वाधिक PMI  आहे.’ 9. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कर्जाची सरासरी किंमत 5.82 टक्के झाली आहे ही 16 वर्षांतील सर्वांत कमी आहे. 10. सहकारी बँकांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम (MSME) उद्योगांना दिलेल्या कर्जांवर दिलेली 2 टक्के व्याज मदत 31 मार्च 2021 पर्यंत दिली जाणार आहे. या योजनेच्या नियमांतही बदल केल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनी दिली.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Rbi, Shaktikanta das

    पुढील बातम्या