RBI पुढच्या महिन्यात व्याजांवर घेणार निर्णय, 'इतका' कमी होऊ शकतो तुमचा EMI

RBI पुढच्या महिन्यात व्याजांवर घेणार निर्णय, 'इतका' कमी होऊ शकतो तुमचा EMI

रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (RBI) जूनमध्ये व्याजदरांमध्ये पुन्हा एकदा कपात करू शकते.

  • Share this:

मुंबई, 29 मे : रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (RBI) जूनमध्ये व्याजदरांमध्ये पुन्हा एकदा कपात करू शकते. एसबीआय इकोरॅपच्या रिपोर्टनुसार RBI जीडीपीच्या वृद्धी दरात तेजी आणण्यासाठी रेपो रेटमध्ये 50 बेसिस पाॅइंट कपात करू शकते. याआधी RBIनं फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात केली होती.

0.50 टक्के कपातीची आशा

SBI नं सांगितलं की RBI पुढच्या माॅनिटरी पाॅलिसीमध्ये व्याज दर 0.35 - 0.50 टक्के कमी करू शकते. पण जेव्हा ट्रान्समिशन होतं, तेव्हा व्याजदरांमध्ये कपात प्रभावी होते.

कॉमस्कोर मोबाईल रिपोर्ट : 'NEWS18 लोकमत'ची मोठी झेप, ABP माझा आणि दिव्य मराठीला टाकलं मागे

GDP वाढ कमी होण्याचा अंदाज

देशाच्या आर्थिक वाढीचा दर मार्च 2019ला संपून चौथ्या तिमाहीत कमी होऊन 6.1-5.9 टक्के होण्याचा अंदाज आहे. असं झालं तर पूर्ण आर्थिक वर्षासाठी आर्थिक वाढ कमी होऊन 7 टक्के खाली येऊ शकते. SBIच्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिलीय.

मोदी सरकारची खास योजना, व्यवसायासाठी गॅरंटीशिवाय मिळतंय 'इतकं' कर्ज

रेपो रेट म्हणजे काय?

दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.

HSC RESULT LIVE : बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर, एका क्लिकवर जाणून घ्या

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

बरेचदा दिवसभर व्यवहार करूनही बँकांकडे मोठी रक्कम शिल्लक राहते. ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

वास्तविक पाहता रिव्हर्स रेपो रेट हा बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँका रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वत:च्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.


पोलिसाच्या हातातली काठी झाली बासरी, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2019 02:58 PM IST

ताज्या बातम्या