मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RBI चे महाराष्ट्रातील या बँकेवर कडक निर्बंध! ग्राहकांना काढता येणार नाही ₹5000 पेक्षा अधिक रक्कम

RBI चे महाराष्ट्रातील या बँकेवर कडक निर्बंध! ग्राहकांना काढता येणार नाही ₹5000 पेक्षा अधिक रक्कम

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI Restriction on bank in Maharshtra) ने सोमवारी महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर (Babaji Date Mahila Sahakari Bank) व्यवसाय निर्बंध लादले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 09 नोव्हेंबर: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI Restriction on bank in Maharshtra) ने सोमवारी महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर (Babaji Date Mahila Sahakari Bank) व्यवसाय निर्बंध लादले आहेत. याशिवाय, ग्राहकांना 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे (5,000 withdrawal limit). गेल्या काही काळापासून आरबीआय सहकारी बँकांविरोधात कठोर धोरण अवलंबत आहे. त्याअंतर्गतच महाराष्ट्रातील या बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, हे निर्बंध लागू झाल्यानंतर बँक 8 नोव्हेंबर 2021 चे कामकाज संपल्यानंतर कोणतेही नवीन लोन जारी करू शकणार नाही. याशिवाय या बँकेला आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणत्याही ठेवी स्विकारता येणार नाही. याशिवाय या बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून 5000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

हे वाचा-या शहरात 1 लीटर पेट्रोलचे दर ₹82.96 तर डिझेल 77.13 रुपयांवर; वाचा आजचा भाव

RBI ने काय म्हटलं?

RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, 'बँकेची लिक्विडिटी स्थिती पाहता सर्व बचत खाते, चालू खाते किंवा कोणत्याही इतर खात्यातून ठेवीदारांना 5000 रु. पेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही. मात्र ज्या ग्राहकांच्या खात्यातून कर्जाचा हप्ता कापला गेला आहे, त्यांना अटींच्या अधीन राहूनच सेटलमेंट करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.'

आरबीआयने असेही म्हटले आहे की या निर्बंधांकडे बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला जातो आहे अशा दृष्टीने पाहिले जाऊ नये. आरबीआयने म्हटले आहे की, बँकेचे आर्थिक आरोग्य सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील. पुढे, रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार वेळोवेळी या सूचनांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करू शकते.

हे वाचा-SMS आणि मिस्ड कॉलद्वारे चेक करा बँक बॅलेन्स, PNB बँकेची सुविधा, पाहा प्रोसेस

6 महिन्यांसाठी निर्बंध

RBI ने सांगितले की हे निर्बंध 8 नोव्हेंबर 2021 रोजी कामकाज बंद झाल्यापासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू होतील. काही सूचनांचे पालन न केल्यामुळे सुमारे दोन आठवड्यांपूर्वी आरबीआयने महाराष्ट्रातील वसई विकास सहकारी बँकेला 90 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. आरबीआयने मुंबईतील अपना सहकारी बँकेला 79 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

First published:

Tags: Rbi, Rbi latest news