• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • RBI ने व्याज दर घटवताच तुमचा EMI ही होईल कमी, 1 एप्रिलपासून लागू होईल नवा नियम

RBI ने व्याज दर घटवताच तुमचा EMI ही होईल कमी, 1 एप्रिलपासून लागू होईल नवा नियम

याचा सर्वात जास्त फायदा गृह आणि इतर सर्व प्रकारच्या कर्जदारांना होणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, ०५ डिसेंबर २०१८-  दर तीन महिन्यांनी होणाऱ्या बैठकीत आज RBI ने त्यांचं पतधोरण जाहीर केलं. या बैठकीत व्याज दरात कोणताही  बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो रेट 6.25 टक्के आहे. RBI ने होम, ऑटो आणि पर्सनल लोनवर एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने व्याजदर कमी केल्यानंतर आता सर्व बँकांनाही तातडीनं आपलं व्याजदर कमी करावे लागतील.  आतापर्यंत आरबीआयने व्याज दर कमी केले की बँका त्यांच्या मर्जीनुसार एक किंवा दोन महिन्यांनी व्याज दर कमी करायचे. मात्र आता आरबीआयचे नियम बदलले तर बँकांनाही लगेच ते बदल लागू करावे लागणार आहेत. पुढच्या वर्षी 1 एप्रिलपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. याचा सर्वात जास्त फायदा गृह आणि इतर सर्व प्रकारच्या कर्जदारांना होणार आहे. आरबीआयची पॉलिसी- रिझर्व्ह बँकेने SLR मध्ये 0.25 टक्क्यांची घट केली आहे. सध्याचा एसएलआर 19.5 टक्के आहे. कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) मध्ये केंद्रीय बँकेने कोणताही बदल केलेला नाही ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कोणतेच बदल केले नव्हते. एमएसएफ बँक रेट 6.75 टक्केवरच कायम आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, मॉनेटरी पॉलिसी कमिटी ग्रोथला सहाय्य करण्यासाठी आणि रिटेल महागाई दराला ४ टक्के (+/-2%) ठेवण्यासाठी रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. वित्तीय वर्ष 2019 मध्ये ७.४ टक्के GDP ग्रोथची शक्यता- बँकेने वित्तीय वर्ष 2018-19 मध्ये 7.4 टक्के जीडीपी ग्रोथ होईल अशी शक्यता वर्तवली आहे. तर वित्तीय वर्ष 2019-20 च्या पहिल्या सहामाहीत 7.5 टक्के जीडीपी ग्रोथ होण्याची शक्यता वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, सुरू वित्तीय वर्षातील दुसऱ्या सहामाहीदरम्यान (ऑक्टोबर- मार्च) 2.7 ते 3.2 टक्के महागाई असण्याचे अनुमान लावण्यात येत आहेत. याआधी 3.9 ते 4.5 टक्के महागाईचा अनुमान लावण्यात आला होता. जूनपासून आरबीआयने सलग दोनदा व्याज दरात वाढ केली आहे. ऑक्टोबरमध्ये अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या अनुमानाच्या विरोधात आरबीआयने व्याज दरात कोणतेही बदल केले नाहीत. रुपयांची घसरण आणि कच्च्या तेलांच्या वाढत्या किंमतीमुळे क्रेंदीय बँक व्याज दरात वाढ करले असे वाटत होते, मात्र तसे झाले नाही. तेव्हा रेपो रेट 6.5 टक्क्यावर कायम ठेवण्यात आला होता. SLR म्हणजे काय- ज्या दरात बँक आपला पैसा सरकारकडे ठेवते त्याला एसएलआर म्हटले जाते. रोख रक्कमेच्या लिक्विडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कर्मशियल बँकांना रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार एक निश्चित रोख रक्कम, सोनं किंवा सरकारद्वारे मान्यता दिलेल्या बॉण्डमध्ये गुंतवणूक करावी लागते. यावर आरबीआयची पूर्ण नजर असते. यामुळे बँकांच्या उधार देण्यावरही नियंत्रण ठेवता येते. राज VS ओवेसी : 'प्रसिद्धीसाठी राज ठाकरेंंची माझ्यावर टीका'
  First published: