मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI Monetary Policy: गृह-वाहन कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा, रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

RBI Monetary Policy: गृह-वाहन कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा, रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण समितीची बैठक संपली आहे. आरबीआय एमपीसीने यावेळी धोरणात्मक व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण समितीची बैठक संपली आहे. आरबीआय एमपीसीने यावेळी धोरणात्मक व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण समितीची बैठक संपली आहे. आरबीआय एमपीसीने यावेळी धोरणात्मक व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण समितीच्या (RBI MPC) झालेल्या बैठकीमध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das)यांनी अशी माहिती दिली आहे की, समितीने आधीचाच रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रेपो रेट 4 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर असणार आहे. आर्थिक धोरण समितीने यावेळी ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे, अनेक अर्थतज्ज्ञांना देखील अशी अपेक्षा नव्हती. आज दुपारी 12 वाजता आरबीआय गव्हर्नर यासंदर्भात पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.

4 टक्के आहे रेपो रेट

सध्या रेपो रेट 4 टक्के आहे. यामध्ये 22 मे 2020 मध्ये बदल करण्यात आला होता. कोरोना काळात MPC च्या बैठकीशिवाय हा निर्णय घेण्यात आला होता. फेब्रुवारी 2020 पासून आतापर्यंत रेपो दरात 1.15 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. इंडिया रेटिंग अँड रिसर्चचे प्रमुख अर्थतज्ज्ञ आणि डिरेक्टर पब्लिक फायनान्स सुनील कुमार सिन्हा यांनी असे म्हटले आहे की आर्थिक विकास जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे रेपो रेट जास्त वाढवण्याच्या अपेक्षा नाही आहे.

(हे वाचा-एका व्यक्तीच्या PF खात्यामध्ये 102 कोटी रुपये! आश्चर्यकारक माहिती आली समोर)

4.59 टक्क्यांवर आहे महागाई दर

डिसेंबर 2020 मधील सरकारी आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दर कमी होऊन 4.59 टक्क्यांवर आला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये किरकोळ महागाई दर 6.93 टक्के होता. किरकोळ महागाई दराच्या आधारे आरबीआय आपला मुख्य व्याज दर ठरवते. महागाई दर घटल्याने व्याज दर देखील कमी होतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात होती. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 5 ऑगस्ट 2016 ते 31 मार्च 2021 पर्यंत किरकोळ महागाई दर सरासरी 4 टक्के (2 टक्के मागे-पुढे होण्याच्या शक्यतेसह) पर्यंत मर्यादित ठेवण्याचे धोरण आखले आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.

First published:

Tags: Rbi