• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • PMC ग्राहकांना 10 वर्षांत मिळणार पूर्ण पैसे, RBI ने केली मोठ्या निर्णयाची घोषणा

PMC ग्राहकांना 10 वर्षांत मिळणार पूर्ण पैसे, RBI ने केली मोठ्या निर्णयाची घोषणा

22 नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (PMC बँक) चे युनिटी स्मॉल फायनान्स बँक (USFB) मध्ये विलीनीकरण करण्यासाठी ड्राफ्ट स्कीम जाहीर केली आहे

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह (Punjab and Maharashtra Co-operative Bank) अर्थात PMC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. 22 नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (PMC बँक) चे युनिटी स्मॉल फायनान्स बँक (USFB) मध्ये विलीनीकरण करण्यासाठी ड्राफ्ट स्कीम जाहीर केली आहे. या मसुद्यानुसार, पीएमसी बँकेची मालमत्ता आणि दायित्वे यूएसएफबीकडे येतील. यामध्ये पीएमसी बँकेच्या ग्राहकांना पैसे परत करण्याचा महत्त्वाचा मुद्दा देखील समाविष्ट आहे. USFB सोबतच्या विलीनीकरणाच्या करारात काही अटी समाविष्ट करण्यात आल्या आहेत, जेणेकरून ग्राहकांच्या पैशाचे रक्षण करता येईल. आरबीआयने काय म्हटलं? आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, 'हे पाहू शकतो की USFB 1100 कोटी रुपयांच्या फंडसह सेटअप तयार करत आहे. रेग्युलेटरी नियमांनुसार स्मॉल फायनान्स बँकांसाठी केवळ 200  कोटी रुपयांची आवश्यकता आहे.' हे वाचा-स्वस्तात मिळत आहेत झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्स, बंपर रिटर्नची अपेक्षा ड्राफ्ट स्कीमअंतर्गत, 1900 कोटी रुपयांचे इक्विटी वॉरंट आहे, जे 8 वर्षांच्या कालावधीत कधीही वापरले जाऊ शकते. हे इक्विटी वॉरंट युनिटी स्मॉल फायनान्स बँकेला 1 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात आले आहे. आरबीआयने या मसुद्यावर 10 डिसेंबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. हे वाचा-पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काही दिवसांत किमती कमी होण्याची शक्यता PMC ग्राहकांना या पद्धतीने मिळणार पैसे? ज्या ग्राहकांचे पैसे PMC बँकेत अडकले आहेत, त्यांना पुढील तीन ते 10 वर्षात पूर्ण पैसे परत मिळतील. RBI च्या ड्राफ्ट स्कीमनुसार, USF बँक ठेवीदारांना 5 लाख रुपयांची गॅरंटिड रक्कम देईल. त्यानंतर, बँक दोन वर्षांनी 50,000 रुपये, तीन वर्षांनी 1 लाख रुपये, चार वर्षांनी 3 लाख रुपये, 5 वर्षांनी 5.5 लाख रुपये आणि 10 वर्षांनी संपूर्ण रक्कम देईल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: