मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI ने या बँकेवर ठोठावला 1 कोटींचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

RBI ने या बँकेवर ठोठावला 1 कोटींचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सहकारी क्षेत्रातील  कोऑपरेटिव्ह राबोबँक यू.ए. ला (Co-operative Rabobank UA) दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सहकारी क्षेत्रातील कोऑपरेटिव्ह राबोबँक यू.ए. ला (Co-operative Rabobank UA) दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सहकारी क्षेत्रातील कोऑपरेटिव्ह राबोबँक यू.ए. ला (Co-operative Rabobank UA) दंड ठोठावला आहे.

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) गुरुवरी सहकारी क्षेत्रातील  कोऑपरेटिव्ह राबोबँक यू.ए. ला (Co-operative Rabobank UA) दंड ठोठावला आहे.  नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी RBI ने 1 कोटी रुपयांचा (1 crore rs penalty on Co-operative Rabobank UA) दंड आकारला आहे. आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, हा दंड बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या काही तरतुदी आणि 'रिझर्व्ह फंड हस्तांतरण' संबंधित सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे आकारण्यात आला आहे.

RBI च्या निर्देशांचं उल्लंघन

केंद्रीय बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2020 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीसंदर्भात पर्यवेक्षी मूल्यमापन वैधानिक चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये असं आढळून आलं की कोऑपरेटिव्ह राबोबँक यू.ए. कडून बँकिंग नियमन अधिनियमच्या तरतुदी आणि आरबीआय द्वारे जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे उल्लंघन करण्यात आले आहे. आरबीआयने यासंबंधिक बँकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटीसवर बँकेकडून मिळालेलं उत्तर आणि सुनावणीनंतर मिळालेलं उत्तर यानंतर ठोठावण्यात आलेला दंड योग्य असल्याच्या निर्णयावर  RBI पोहोचलं आहे.

हे वाचा-Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी, मुंबईत पेट्रोल 107 रुपयांपार

या बँकांना देखील ठोठावण्यात आला आहे दंड

आणखी एका निवेदनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे की, कोलकातामधील व्हिलेज फायनान्शिअल सर्व्हिसेसला केवायसी नियमातील काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केंद्रीय बँकेने अशी देखील माहिती दिली आहे की अहमदनगर मर्चेंट कोऑपरेटिव्ह बँकेवर 13 लाख, अहमदाबादच्या महिला विकास कोऑपरेटिव्ह बँकेवर दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हे वाचा-SBI-PNB सह या बँकांच्या ATM मधून किती काढता येतील पैसे? वाचा काय आहे नियम

ग्राहकांवर काय होणार परिणाम?

आरबीआयने म्हटले आहे की दंड नियामक अनुपालनातील कमतरतेवर आधारित आहे आणि दोन कर्जदात्यांद्वारे त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही कराराची किंवा व्यवहाराची वैधता स्पष्ट करणे असा याचे उद्दिष्ट्य नाही आहे.

First published:

Tags: Rbi, Rbi latest news