मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI चा 'या' बँकेला झटका! ठोठावला 30 लाखांचा दंड, महाराष्ट्रातील 2 बँकांवरही कारवाई

RBI चा 'या' बँकेला झटका! ठोठावला 30 लाखांचा दंड, महाराष्ट्रातील 2 बँकांवरही कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एमयूएफजी (MUFG) बँकेवर ही दंडात्मक कारवाई (RBI Imposed Penalty on MUFG Bank) केली असून, या बँकेला 30 लाख रुपया्ंचा दंड भरावा लागणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एमयूएफजी (MUFG) बँकेवर ही दंडात्मक कारवाई (RBI Imposed Penalty on MUFG Bank) केली असून, या बँकेला 30 लाख रुपया्ंचा दंड भरावा लागणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एमयूएफजी (MUFG) बँकेवर ही दंडात्मक कारवाई (RBI Imposed Penalty on MUFG Bank) केली असून, या बँकेला 30 लाख रुपया्ंचा दंड भरावा लागणार आहे.

मुंबई, 25 डिसेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आखलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास बँकांना कारवाईला सामोरे जावे लागते. कर्जाबाबतच्या वैधानिक आणि इतर निर्बंधांबाबत केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याने RBI ने अशाचप्रकारे एका बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एमयूएफजी (MUFG) बँकेवर ही दंडात्मक कारवाई (RBI Imposed Penalty on MUFG Bank) केली असून, या बँकेला 30 लाख रुपया्ंचा दंड भरावा लागणार आहे.

बँकेवर का करण्यात आली कारवाई?

एमयूएफजी बँकेने कर्जाबाबत आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, MUFG बँकेने अशा कंपन्यांना कर्ज दिले आहे ज्यांच्या संचालक मंडळात इतर बँकांच्या संचालकांचा समावेश होता. हे स्पष्टपणे आरबीआयच्या कर्जासंदर्भातील वैधानिक नियमांचे उल्लंघन आहे. यासह 11 मार्च 2019 रोजी करण्यात आलेल्या आर्थिक स्थितीच्या पर्यवेक्षण मुल्यांकनानुसार आरबीआयला असे आढळून आले की इतर कंपन्यांना कर्ज देण्याबाबत अन्य काही निर्देशांचे पालनही या बँकेने केले नाही आहे. आरबीआयने MUFG बँकेला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीनंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.

हे वाचा-तुमच्याकडचं सोनं खरं की खोटं? जाणून घ्या या App द्वारे Gold ची गुणवत्ता

महाराष्ट्रातील या बँकांवर कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आखलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्रातील दोन सहकारी (RBI Imposed Penalty on banks in Maharashtra) बँकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने कारवाई केलेल्या या बँकांमध्ये एक बँक रत्नागिरी तर दुसरी मुंबईतील आहे. चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, रत्नागिरी या बँकेने काही अर्जदारांबाबत आखून दिलेल्या मर्यादेच्या नियमांचे पालन न केल्याने कारवाई करण्यात आली आहे. तर मुंबईतील दत्तात्रय महाराज कळांबे जाऊळी सहकारी बँक लिमिटेडवरही याच कारणामुळे कारवाई करण्यात आली आहे.

हे वाचा-Secured आणि Unsecured क्रेडिट कार्डमध्ये फरक काय? कोणतं कार्ड ठरेल फायदेशीर?

पेमेंट सिस्टम ऑपरेटरवरही आरबीआयची कारवाई

नियमांचे उल्लंघन केल्याने आरबीआयने  मोबिक्विक सिस्टम्स (One Mobikwik Systems) आणि स्पाइस मनी लिमिटेड (Spice Money Limited) वर दंड ठोठावला आहे. वन मोबिक्विक आणि स्पाइस मनी या दोन्हींवर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, One MobiKwik आणि Spice Money ने भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिटसाठी नेट वर्थ आवश्यकतांबाबत रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता केली नाही.

First published:
top videos

    Tags: Rbi, Rbi latest news