मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बँकांना RBI ने ठोठावला दंड, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बँकांना RBI ने ठोठावला दंड, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश

भारतात राष्ट्रीय बँका, सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) घालून दिलेले नियम पाळून व्यवसाय करणं बंधनकारक असतं. या नियमांचं उल्लंघन केलं तर आरबीआय त्यांच्यावर कारवाई करते.

नवी दिल्ली, 21 मे: भारतात राष्ट्रीय बँका, सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) घालून दिलेले नियम पाळून व्यवसाय करणं बंधनकारक असतं. या नियमांचं उल्लंघन केलं तर आरबीआय त्यांच्यावर कारवाई करते. कोणते नियम मोडले गेले त्यानुसार आरबीआय दंडात्मक किंवा अन्य पद्धतीची कारवाई करते. आरबीआयने नुकतंच सिटी युनियन बँक आणि तमिळनाडू मर्केंटाइल बँक यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने अहमदाबादमधील नूतन नागरिक सहकारी बँक आणि डेमलर फायनॅन्शियल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांवरही कारवाई करून त्यांना दंड ठोठावला आहे.

याआधी महाराष्ट्रातील प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी बँकेलाही आरबीआयने 1 लाख रुपयांचा दंड केला आहे. महाराष्ट्रातील प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी बँकेने सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क म्हणजे SAF शी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना रिझर्व्ह बँकेने 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल सिटी युनियन बँकेला एक कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तमिळनाडू मर्केंटाइल बँकेने आरबीआयने सायबर सुरक्षेसंबंधी केलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांनाही एक कोटी रुपयांचा दंड करण्यात आल्याचं आरबीआयच्या पत्रकात म्हटलं आहे.

हे वाचा-केंद्र सरकारकडून 1 लाख LPG डिलिव्हरी सेंटर होताहेत सुरू; बिझनेस करण्याची संधी

नूतन नागरिक सहकारी बँकेने त्यांच्याकडील ठेवींवरील व्याज दर, ग्राहकांची माहिती (KYC)योग्य पद्धतीनं दिली नाही तसंच घोटाळा आणि रिपोर्टिंग मेकॅनिझमसंबंधी आरबीआयच्या सर्क्युलरमध्ये दिलेल्या नियमांचं उल्लंघन केलं त्यामुळे त्यांना 90 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

डेमलर फायनॅन्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केलं त्यामुळे या बँकेला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सहकारी बँका रेग्युलेटरी कंप्लायन्सचे नियम पाळू शकल्या नाहीत त्यामुळे आरबीआयने काही प्रश्न उपस्थित केले. त्याची उत्तरं या बँका समाधानकारकपणे देऊ शकल्या नाहीत.त्यामुळे आरबीआयने त्यांना दंड ठोठावला असंही आरबीआयने पत्रकात स्पष्ट केलं.

हे वाचा-ITR Filing : आर्थिक वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले नियम पाळणं हे बँकांसाठी बंधनकारक असतं त्यामुळे ग्राहकांना योग्य व सुरक्षित सेवा मिळते. आरबीआयच्या वतीने वारंवार बँकांच्या व्यवहारांची तपासणी होत असते त्यामुळे ही यंत्रणा व्यवस्था सुरळीत चालते आणि आर्थिक घोटाळ्यांना पायबंद बसतो.

First published:

Tags: Rbi, Rbi latest news