Home /News /money /

आता 15 हजारांपर्यंतच्या ऑटो-डेबिट पेमेंटसाठी OTPची गरज नाही, RBIचा मोठा निर्णय

आता 15 हजारांपर्यंतच्या ऑटो-डेबिट पेमेंटसाठी OTPची गरज नाही, RBIचा मोठा निर्णय

RBI ने 1 ऑक्टोबर 2021 पासून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI च्या मदतीने रिकरिंग पेमेंटसाठी (recurring transactions) OTP ऑथेंटिकेशन अनिवार्य केले आहे. सध्या, 5000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी OTP ऑथेंटिकेशन आवश्यक नाही.

    मुंबई, 8 जून : ऑटो-डेबिट पेमेंट (Auto Debit Payment) करताना तुम्हाला वारंवार OTP आल्याने त्रास होत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. RBI ने OTP शिवाय ऑटो-डेबिट पेमेंटची मर्यादा 5 हजारांवरून 15 हजार रुपये केली आहे. रिकरिंग पेमेंट (ऑटो-डेबिट पेमेंट) सुलभ करण्यासाठी आरबीआयने (Reserve Bank Of India) हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती RBI च्या मॉनिटरिंग पॉलिसीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत यांनी दिली. RBI ने 1 ऑक्टोबर 2021 पासून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI च्या मदतीने रिकरिंग पेमेंटसाठी (recurring transactions) OTP ऑथेंटिकेशन अनिवार्य केले आहे. सध्या, 5000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी OTP ऑथेंटिकेशन आवश्यक नाही. या निर्णयानंतर आता ही मर्यादा 15 हजार करण्यात आली आहे. मात्र, यापेक्षा जास्त रक्कम भरल्यास ओटीपी देणे बंधनकारक आहे. ओटीपीशिवाय 15 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरली जाणार नाही. 'पत्रिका' वेबसाईटने याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे. Repo Rate Hike: रेपो रेट वाढीनंतर घर आणि कार लोनचा EMI किती वाढणार? कॅल्क्युलेशन पाहा 40% पेक्षा जास्त पेमेंट अयशस्वी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, रिकरिंग पेमेंटची मर्यादा वाढल्याने ग्राहक पेमेंट करू शकतील. हा निर्णय बँका आणि ग्राहक दोघांसाठी फायदेशीर आहे. यासह, त्यांनी सांगितले की जुन्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे 40 टक्क्यांपेक्षा जास्त पेमेंट अयशस्वी होतात. त्याच वेळी, ओटीपीद्वारे ऑथेंटिकेशननंतर 5 हजारांहून अधिक पेमेंट सेटअप करावे लागले. ही रक्कम कमी होती, त्यामुळे त्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. रेपो दर दोन महिन्यांत 90 बेसिस पॉईंटने वाढला RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरणाच्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिक पॉईंट्सची वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मागील महिन्यात देखील रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांत रेपो रेट 90 बेस पॉईंटने वाढला आहे. या वाढीचा थेट परिणाम कर्जावर होत आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल नेमकं कसं असतं? वाहनांसाठी ते फायदेशीर की हानिकारक? तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे UPI सह पेमेंट करू शकाल सध्या UPI द्वारे फक्त सेव्हिंग आणि करंट खात्यांमधून पेमेंट केले जाऊ शकते, परंतु RBI लवकरच ही सेवा क्रेडिट कार्डसाठी देखील सुरू करणार आहे. यासोबतच आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत यांनी सांगितले की, ही सेवा प्रथम रुपे क्रेडिट कार्डमध्ये सुरू केली जाईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Online payments, Rbi

    पुढील बातम्या