नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्वरित पेमेंट सेवा अर्थात IMPS द्वारे दररोज फंड ट्रान्सफरची मर्यादा 2 लाखांवरुन वाढवून 5 लाख रुपये केली आहे. 6 ते 8 ऑक्टोबरपर्यंत रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समितीची (MPC) द्विमासिक बैठत झाली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यानंतर RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली.
आता दररोज 5 लाखांपर्यंत करता येणार व्यवहार -
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या Immediate Payment Service (IMPS) द्वारे कोणीही व्यक्ती आठवड्याच्या कोणत्याही दिवशी आणि 24 तास फंड ट्रान्सफर करू शकतो. ही सुविधा इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग App, बँक शाखा, ATM, SMS आणि IVRS सारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळते.
SMS आणि IVRS चॅनेलसाठी प्रति ट्रान्झेक्शन लिमिट 5000 रुपये आहे. Immediate Payment Service (IMPS) सह RTGS देखील 24 तास होत आहे. RTGS नंतर IMPS सेटलमेंट सायकल वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. IMPS मर्यादेत वाढ झाल्यामुळे डिजिटल पेमेंटला चालना मिळेल. आता ग्राहक दोन लाख रुपयांपेक्षा जास्त डिजिटल पेमेंट सहज करू शकतील.
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की RBI ने मुख्य व्याज दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत रेपो रेट 4 टक्के ठेवण्यात आला आहे. तक रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकने 2021-22 साठी GDP Growth अंदाजे 9.5 टक्के ठेवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rbi, Rbi latest news