HDFC बँकेवर RBI ने आणलेल्या निर्बंधांचा ग्राहकांवर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर

HDFC बँकेवर RBI ने आणलेल्या निर्बंधांचा ग्राहकांवर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर

तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशाची केंद्रीय बँक असणाऱ्या RBI ने HDFC बँकेच्या डिजिटल सेवा थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 डिसेंबर: तुम्ही जर HDFC  बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही काळापासून डिजिटक कामकाजामुळे येणाऱ्या समस्येमुळे आयबीआयने एचडीएफसी बँकेला फटकारलं आहे. आरबीआयने एचडीएफची बँकेच्या प्रस्तावित डिजिटल सेवांवर बंदी आणली आहे. खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या HDFC बँकेच्या डिजिटल सेवा थांबवण्याचे आदेश केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) दिले आहेत. बँकेच्या Digital 2.0 या उपक्रमाअंतर्गत असणाऱ्या सुविधा आणि ग्राहकांसाठी नवीन कार्ड्स लाँच करण्याच्या सेवा थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्यावरही बंदी आणली आहे.

ग्राहकांवर काय होणार परिमाण?

बँकेने असं म्हटलं आहे की, गेल्या दोन वर्षांत आयटी प्रणाली मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बॅलन्स संदर्भातील काम लवकरच बंद करण्याबाबत बँक वेगाने काम सुरू ठेवेल आणि या संदर्भात नियामकांबरोबरच काम करत राहील.

बँकेच्या मते डिजिटल बँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी बँकेकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. HDFC बँकेने ग्राहकांना सांगितले आहे की या आदेशानंतर सध्याचे क्रेडिट कार्ड ग्राहक, डिजिटल बँकिंग चॅनल्स आणि सध्याच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. जेव्हा बँकेकडून सर्व संबंधित नियामकीय अनुपालनांची पूर्तता केली जाईल, तेव्हा हे प्रतिबंध हटवले जातील.

(हे वाचा-LIC Policy: राहणार नाही मुलीच्या लग्नाचं टेन्शन! रोज करा 121 रुपयांची बचत, कन्यादानावेळी मिळवा 27 लाख)

चालू कामकाजावर म्हणजेच सध्याचे क्रेडिट कार्ड आणि डिजिटल बँकिंगवर आरबीआयच्या आदेशाचा परिणाम होणार नाही आहे. बँकेचे 2848 शहरांमध्ये 15,292 एटीएम आहेत. बँकेकडून आतापर्यंत 14.9 मिलियन क्रेडिट कार्ड आणि 33.8 मिलियन डेबिट कार्ड जारी करण्यात आले आहेत.

बँकेला करावा लागतोय या समस्यांचा सामना

गेल्या 2 वर्षांपासून बँकेला इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि पेमेंट युटिलिटी सेवांमध्ये अनेक समस्यांचा (multiple outages) सामना करावा लागत  आहे, परिणामी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयची ही बंदी स्थायी स्वरूपाची नसून अस्थायी आहे. गेल्या 2 वर्षातील ही तिसरी वेळ आहे, जेव्हा HDFC बँकेवर कोणत्या प्रकारचे निर्बंध आणण्यात आले आहेत. नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही निर्बंध आहेत. त्याचबरोबर आरबीआयने असेही म्हटले आहे की या खाजगी बँकेच्या बोर्डाने त्रुटी दूर करत जबाबदारी निश्चित केली पाहिजे.

(हे वाचा- बदलला बँक खात्यातून पैसे काढण्याचा नियम, कोट्यवधी ग्राहंकावर होणार थेट परिणाम)

2 डिसेंबर 2020 च्या आदेशामध्ये आरबीआयने हल्लीच बँकेला सामोरे जावे लागलेली एक समस्या नमूद केली आहे. 21 नोव्हेंबर 2020 रोजी बँकेला त्यांच्या प्राथमिक डेटा सेंटरमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या आउटेजचा सामना करावा लागला होता. याआधी देखील बँकेसमोर अशी समस्या उद्भवली होती. यामुळे आरबीआय याबाबतची सविस्तर माहिती  जाणून घेऊ इच्छित आहे. जेणेकरून बँकेतील एटीएम ऑपरेशन, कार्ड्स आणि UPI व्यवहार बाधित होऊ नयेत.

आरबीआयने प्राथमिक स्तरावर Digital 2.0 अंतर्गत असणारे सर्व डिजिटल बिझनेसचे लाँच यावर अस्थायी स्वरूपात स्थगिती आणली आहे, इतर आयटी अॅप्लिकेशन जनरेटिंगही करता येणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, HDFC बँकेला ग्राहकांसाटी नवीन क्रेडिट कार्ड्सचे सोर्सिंग करता येणार नाही आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 3, 2020, 1:50 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या