नवी दिल्ली, 29 मार्च : कोरोनामुळे (Coronavirus) संपूर्ण जगामध्ये भीतीचं वातावरण आहे. भारतात देखील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णा्ंची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव आणि व्हायरसचे संक्रमण कसं रोखाल, यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी एक व्हिडीओ प्रसारीत केला आहे. RBI ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
(हे वाचा-SBI पाठोपाठ या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर, व्याजदरांमध्ये मोठी कपात)
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा पाचवा दिवस आहे. एकूण 21 दिवस म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत या लॉकडाऊनचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान शक्तिकांत दास यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून पारंपरिक पेमेंट पद्धती टाळून, डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. Digital Transaction चा वापर करून आपण एकप्रकारे संक्रमणापासून स्वत:चा बचाव करू शकतो. COVID-19 पासून वाचण्यासाठी 'बचाव' हा एकमेव उपाय असल्याचंही दास म्हणाले.
RBI Governor @DasShaktikanta message on safety measures during difficult times!
Pay digital, stay safe!#rbitoday #rbigovernor #COVID19#IndiaFightsCoronavirus#StayCleanStaySafeGoDigital pic.twitter.com/MEe68lr5kc
— ReserveBankOfIndia (@RBI) March 27, 2020
त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले आहे. ते म्हणाले की,'देश ज्या संकटातून जात आहे, अशावेळी तुम्ही घरीच राहा आणि डिजिटल व्यवहार करा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा मोबाइलच्या माध्यमातून हे काम होऊ शकतं.' शक्तिकांत दास यांनी जारी केलेल्या व्हिडीओतून असा संदेश दिला आहे की, डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आहे कारण नोटांच्या माध्यमातून व्हायरसचे संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे.
आरबीआयने उचलली महत्त्वाची पावलं
कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यात आरबीआयने अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत.त्यामुळे सामान्यांना या कठीण परिस्थितीत मोठा दिलासा मिळाला आहे. व्याजदारमध्ये कपात तसंच ईएमआय संदर्भात शिथिलता आणण्याचा प्रयत्न आरबीआयकडून करण्यात आला आहे.