खूशखबर! 1 जानेवारीपासून बँकांच्या बचत खात्यांवर मिळणार ही सुविधा

खूशखबर! 1 जानेवारीपासून बँकांच्या बचत खात्यांवर मिळणार ही सुविधा

रिझर्व्ह बँकेने सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. बचत खात्यांमधून ऑनलाइन व्यवहार करताना NEFT चार्जेस लागणार नाहीत.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : रिझर्व्ह बँकेने सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. बचत खात्यांमधून ऑनलाइन व्यवहार करताना NEFT चार्जेस लागणार नाहीत. हा नियम 1 जानेवारी 2020 पर्यंत लागू होईल. याचा अर्थ असा की तुम्ही 1 जानेवारी 2020 पासून NEFT च्या माध्यमातून व्यवहार केलात तर त्यावर हे चार्जेस लागणार नाहीत. ऑनलाइन व्यवहार करताना NEFT आणि RTGS चा वापर केला जातो. या दोन्ही यंत्रणांवर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं.

लोकांना पैशांचे व्यवहार सुरक्षित, सोप्या आणि फायदेशीर पद्धतीने करता यावे यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे. ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या काळात नॉन कॅश रिटेल पेमेंटमध्ये डिजिटल पेमेंटचा वाटा 96 टक्क्यांचा आहे. याच काळात NEFT च्या माध्यमातून 252 कोटी आणि यूपीआय पेमेंट यंत्रणांच्या माध्यमातून 874 कोटींची देवाणघेवाण झाली आहे.

NEFT म्हणजे काय?

NEFT म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर च्या माध्यमातून देशातल्या एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठवता येतात. NEFT ने पैसे पाठवताना सर्व प्रकारची माहिती पाठवावी लागते. या पद्धतीने पैसे पाठवण्याचं हे तंत्र सुरक्षित आहे.

========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneySBI
First Published: Nov 8, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या