बातमी सर्वसामान्यांसाठी! रेपो रेटमध्ये कपात नसल्याने कर्जाच्या EMI मध्ये दिलासा नाहीच

बातमी सर्वसामान्यांसाठी! रेपो रेटमध्ये कपात नसल्याने कर्जाच्या EMI मध्ये दिलासा नाहीच

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली द्विमाही पतधोरण जाहीर करण्यात आले. यावेळी पतधोरणात रेपो दरात कोणताच बदल न करता कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दर कपात न केल्याने सर्वसामान्यांना कर्जाच्या हप्त्यांमध्ये (EMI) कोणताच दिलासा मिळालेला नाही आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली द्विमाही पतधोरण जाहीर करण्यात आले. यावेळी पतधोरणात रेपो दरात कोणताच बदल न करता कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याचा रेपो दर हा 5.15 टक्के इतका आहे. आता हाच रेपो दर पुढे कायम राहणार आहे. तसेच, रिव्हर्स रेपो रेट 4.90 टक्क्यांवर कायम असणार आहे. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात न केल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.

असा फायदा होतो रेपो रेटचा

बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर लागणारा व्याज दराला रेपो दर म्हटलं जातं. बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात घट झाली तर, त्याचा फायदा हा निश्चितच ग्राहकांना होणार. बँकेकडून तुम्ही जेव्हा कर्ज घेतात, तेव्हा त्याचा फायदा होत असतो.

हेही वाचा -वीज मीटर होणार 'प्रीपेड', रिचार्ज केल्यानंतर मिळणार वीज

रेपो रेट वाढला तर, बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होते आणि कमी झाल्यास बँकेला स्वस्तात कर्ज मिळते. याचा परिणाम कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या व्याज दरात होत असतो. रेपो दरात कपात झाल्यास ग्राहकांना त्याचा फायदा होतो. आता मात्र रेपो दरात कपात न झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या EMIमध्ये कोणताच बदल होणार नाही आहे.

रिव्हर्स रेपो दरही समजून घ्या

रिव्हर्स रेपो दर हा रेपो रेटच्या विरुद्ध काम करत असतो, असं म्हणायला हरकत नाही. बँका त्यांच्याकडील अधिकचा निधी ठेवींच्या रुपात रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बँक बँकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हटलं जातं.

हे वाचा - LIC पॉलिसीधारकांनी बातमी वाचाच! बजेटमध्ये झालेल्या घोषणेनंतर असा होणार परिणाम

First published: February 6, 2020, 3:19 PM IST

ताज्या बातम्या