मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द

रुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरात द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शंभर वर्षे जुनी असणाऱ्या लक्ष्मी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे आदेशही दिले गेले आहेत

  प्रीतम पंडित, सोलापूर 23 सप्टेंबर : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरात द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शंभर वर्षे जुनी असणाऱ्या लक्ष्मी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे आदेशही दिले गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी बँक आर्थिक अडचणीत आल्याने ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र ठेवीदारांचे पैसे परत मिळतील, असं आश्वासन बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आलं होतं. दरम्यान त्यातील काही ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात आल्या. परंतु, 94 हजार ठेवीदारांच्या ठेवी बँकेमध्ये अडकून पडल्या आहेत.
  phone pe going Karnataka : वेदांता-फॉक्सकॉननंतर आता 'ही' कंपनी महाराष्ट्र सोडणार लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेची 105 कोटी रुपयांची थकबाकी कर्जदारांकडे आहे. लवकरच या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं. ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार असल्याचंही सांगण्यात आलं. रिझर्व बँक ऑफ इंडियाने लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेवरती प्रशासक नियुक्त केलेला आहे. बँकेचे ठेवीदार 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करू शकतात, असं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.सहकारी बँकेकडं पुरेसं भांडवल नसल्याने सध्याच्या ठेवीदारांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नसल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. Spicejet च्या स्टॉक धारकांना डबल धक्का! गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी बँकेचा परवाना रद्द केल्याची घोषणा करताना मध्यवर्ती बँकेनं म्हटलं आहे की, बँकेने दिलेल्या तपशिलानुसार 95 टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमार्फत दिल्या जातील. जर बँक बुडली, तर प्रत्येक ठेवीदाराला नवीन नियमांनुसार ठेव रकमेवर विमा दावा करण्याचा अधिकार असून, त्याची मर्यादा पाच लाखांपर्यंत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bank services, Solapur news

  पुढील बातम्या