• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Bank Holiday: ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची यादी

Bank Holiday: ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची यादी

बँकेशी संबधित तुमचं काही काम असेल तर नियोजन आखूनच ते काम पूर्ण करा. कारण या महिन्यात बंपर बँक हॉलि़डे (Bank Holiday in August 2021) असणार आहेत. कधी सुट्टी हे आहे हे माहित नसल्यास तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळे इथे तपासा सुट्ट्यांची यादी

 • Share this:
  नवी दिल्ली, o1 ऑगस्ट: बँकेशी संबधित तुमचं काही काम असेल तर नियोजन आखूनच ते काम पूर्ण करा. कारण या महिन्यात बंपर बँक हॉलि़डे (Bank Holiday in August 2021) असणार आहेत. कधी सुट्टी हे आहे हे माहित नसल्यास तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. हे बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. कोरोना काळात (Coronavirus Pandemic) विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या (Bank Holiday) तपासूनच बँकेला भेट द्या. अन्यथा तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. हे वाचा-अर्थ मंत्रालय दरमहा देतंय 1.30 लाख रोखरक्कम? वाचा सविस्तर RBI निश्चित करतं सुट्ट्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holiday List) जारी केली जाते. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सुट्ट्यांची यादी तपासू शकता. प्रत्येत महिन्याची यादी याठिकाणी पाहता येईल. ऑगस्टमध्ये किती आहेत सुट्ट्या? ऑगस्ट महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. वेगवेगळ्या राज्यांत सुट्ट्यांचे दिवस वेगवेगळे असू शकतात. दर रविवारी तसंच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. याशिवाय प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. ऑगस्ट महिन्यात या आहेत सुट्ट्या (Bank Holiday in August 2021) 1 ऑगस्ट 2021: रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी 8 ऑगस्ट 2021: रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी 13 ऑगस्ट 2021: Patriot’s Day मुळे इंफाळ झोनमध्ये बँकेची सुट्टी 14 ऑगस्ट 2021 : दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी 15 ऑगस्ट 2021: रविवार आणि स्वातंत्र्य दिन असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी 16 ऑगस्ट 2021: पारसी नववर्षामुळे महाराष्ट्रातील बेलापूर, मुंबई आणि नागपूर विभागांमध्ये बँक हॉलिडे हे वाचा-5 तास सलग काम केल्यानंतर ब्रेक आवश्यक, लवकरच बदलू शकते ऑफिसमधल्या कामाची पद्धत 19 ऑगस्ट 2021: मोहरम असल्याने आगरतळा झोन, अहमदाबाद विभाग, बेलापूर झोन, भोपाळ झोन, हैदराबाद विभाग, जयपूर विभाग, जम्मू विभाग, कानपूर विभाग, कोलकाता विभाग, लखनऊ विभाग, मुंबई विभाग, नागपूर विभाग, नवी दिल्ली झोन, पटना झोन, रायपूर झोन, रांची झोन ​​आणि श्रीनगर झोनमध्ये बँकांना सुट्टी 20 ऑगस्ट 2021: मोहरम आणि पहिल्या ओणम असल्यामुळे बंगळुरू झोन, चेन्नई झोन, कोची झोन ​​आणि केरळमध्ये झोनमध्ये बँकांना सुट्टी 21 ऑगस्ट 2021: थिरुवोणममुळे कोची आणि केरळ झोनमध्ये बँकांना सुट्टी 22 ऑगस्ट 2021: रविवार आणि रक्षाबंधन 23 ऑगस्ट 2021: श्री नारायण गुरु जयंतीमुळे कोची झोन ​​आणि केरळमध्ये बँकांना सुट्टी 28 ऑगस्ट 2021: चौथ्या शनिवारमुळे बँकांना सुट्टी असेल 29 ऑगस्ट 2021: रविवार 30 ऑगस्ट 2021: जन्माष्टमीमुळे बँका राहणार बंद 31 ऑगस्ट 2021: श्रीकृष्ण अष्टमीमुळे हैदराबादमध्ये बँका बंद
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: