वर्षभरात बँकांना 71 हजार 543 कोटींचा चुना; RBIच्या अहवालात खुलासा!

वर्षभरात बँकांना 71 हजार 543 कोटींचा चुना; RBIच्या अहवालात खुलासा!

देशात गेल्या वर्षी बँकांची फसवणूक करण्याच्या प्रमाणात 15 टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक बाब रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालातून समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट: देशात गेल्या वर्षी बँकांची फसवणूक करण्याच्या प्रमाणात 15 टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक बाब रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालातून समोर आली आहे. बँकांच्या फसवणुकीच्या रक्कमेत तब्बल 73.8 टक्के इतकी वाढ होत ती 71 हजार 542.93 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. RBIच्या या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. गुरुवारी बँकेने 2018-19साठीचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. देशातील उपलब्ध चलन 17 टक्क्यांनी वाढून ते 21.10 लाख कोटींवर पोहोचल्याचे अहवालात म्हटले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात फसवणुकीची 6 हजार 801 प्रकरणे उघडकीस आली आहेत.

आर्थिक पातळीवर मंदी

RBIच्या अहवालानुसार देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे आर्थिक घडामोडी मंद झाल्या आहेत. अर्थव्यवस्थेची गती वाढवण्यासाठी खासगी गुंतवणूक वाढवण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. IL&FS संकटानंतर NBFCकडून उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्यात 20 टक्क्यांची घट झाली आहे. RBI हा अहवाल प्रत्येक वर्षी प्रसिद्ध केला जातो. या अहवालात बँकेच्या कामकाजाचे विश्लेषण केले जाते तसेच अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी उपाय योजना सुचवल्या जातात.

केंद्र सरकारला देण्यात आलेल्या 52 हजार 637 कोटी मुळे RBIकडे सध्या 1 लाख 96 हजार 344 कोटी इतका निधी शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच वेळी RBIकडे 2 लाख 32 हजार 108 कोटी इतका निधी होता. अर्थात बँकेकडून देण्यात आलेले 52 हजार कोटी ही रक्कम बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमीच आहे. बाजाराची अशी अपेक्षा होती की बँकेकडून सरकारला अतिरिक्त निधी म्हणून एक लाख रुपये मिळतील. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सातव्या वेतन आयोगाची शिफारस आणि सामाजिक योजनांमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक यामुळे आर्थिक क्षमता घटल्याचे अहवालात म्हटले आहे.

RBIने काही दिवसांपूर्वी लाभांश आणि अतिरिक्त निधीतून सरकारला 1.76 लाख कोटी देण्याची घोषणा केली होती. या निधीचा उपयोग अर्थव्यवस्थेची गती वाढवण्यासाठी केला जाणार आहे.

SPECIAL REPORT : 'तुम्ही कुणाच्या मांडीला मांडी लावून बसायला निघाला'

Published by: Akshay Shitole
First published: August 29, 2019, 9:33 PM IST
Tags: rbi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading