आता कार्डने पेमेंट करताना द्यावा लागेल 'हा' नंबर, RBI ने दिले आदेश

डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणं आणखी सुरक्षित होणार आहे. कारण रिझर्व्ह बँकेनं या कार्डची माहिती बदलण्याचे आदेश दिले आहेत

  • Share this:

डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डने ट्रान्जॅक्शन करणं आता आणखी सुरक्षित होणार आहे. कारण आता कार्ड नंबरने पेमेंट करणं बंद होणार असून दरवेळी पेमेंट करताना बँकेकडून टोकन नंबर जारी केला जाणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.

नवीन नियमानुसार यापुढे कोणताही व्यवहार करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती गरजेची नाही. कोणतेही ऑनलाइन पेमेंट करताना बँकेकडून एक टोकन नंबर जारी करण्यात येईल. नवीन सिस्टिममध्ये कार्डच्या माहितीमध्ये एक विशेष कोड दिला जाईल. ऑनलाइन व्यवहार करताना कार्डच्या माहिती ऐवजी आता हा टोकन कोडचा वापर केला जाईल.

या टोकन नंबरमुळे कोणत्याही अॅप किंवा वेबसाइटवर कार्डची माहिती सेव्ह राहण्याची भिती नसेल. या व्यतिरिक्त POS आणि QR कोडच्या सहाय्याने जरी पेमेंट करायचे असेल तर टोकन क्रमांकाचाच वापर करावा लागेल. दरवेळी व्यवहार करताना वेगवेगळा टोकन क्रमांक जारी केला जाईल आणि यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जाणार नाही.

टोकन क्रमांकाची सिस्टिम लागू झाल्यावर तुमच्या कार्डचा क्रमांक कोणात्याही व्यक्तीला समजणार नाही. एवढेच नव्हे तर बँक कर्मचाऱ्यालासुद्धा हा क्रमांक माहीत नसेल. त्याचबरोबर ट्रांजॅक्शन करताना गडबड झाली तर कार्ड पेमेंट कंपनीच यासाठी जबाबदार राहील.

सध्या ही सुविधा स्मार्ट फोन आणि टॅबलेट असणाऱ्यांसाठी आहे. लोकांच्या योग्य प्रतिसादानंतर या सिस्टिमला दुसऱ्या डिव्हाइसवर अॅड करण्यात येईल असं बँकेनं सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 06:35 AM IST

ताज्या बातम्या