RBI ची मोठी घोषणा, ग्राहकांना आता द्यावे नाही लागणार बँकेचे 'हे' दर

RBI नं ग्राहकांचा विचार करून नव्या घोषणा केल्यात

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 01:12 PM IST

RBI ची मोठी घोषणा, ग्राहकांना आता द्यावे नाही लागणार बँकेचे 'हे' दर

मुंबई, 06 जून : रिझर्व्ह बँक आॅफ इंडायानं सर्वसामान्यासाठी मोठी घोषणा केलीय. आरबीआयनं  RTGS आणि NEFT वर बँकाकडून आकारण्यात येणारे दर रद्द केलेत. RBI बँकांकडून हे दर घेत होती, पण आता ते घेणार नाही. त्यामुळे ग्राहकांना फक्त बँक जे दर आकारेल तेच द्यावे लागतील.  म्हणजे RTGS आणि NEFT स्वस्त होतील. RBI याबद्दल सवकरच एक पत्रक काढेल.

RTGS (Real-time gross settlement) हे लाखो रुपये ट्रान्सफर करायचं उत्तम माध्यम आहे. या माध्यमात काही सेकंदात पैसे ट्रान्सफर होतात. याउलट एनईएफटी (National electronic funds transfer ) ठराविक वेळीच पैसे ट्रान्सफर होतात.

RBI नं केली रेपो दरात कपात, आता गृहकर्ज कमी होण्याची शक्यता

10 वीच्या निकालानंतर गोंधळून जाऊ नका, असं निवडा तुमचं करिअर

RTGS मधून किती पैसे ट्रान्सफर करू शकतो? - RTGS मधून 2 लाख रुपये किंवा त्याहून कमी पैसे ट्रान्सफर करता येतात. यासाठी खास वेळही असते. रिझर्व्ह बँकेनं आरटीजीएस ट्रान्सफरची वेळ दीड तासानं वाढवलीय.

Loading...

World Cup : भारताच्या ‘या’ शिलेदारांनी फेरले दक्षिण आफ्रिकेच्या आशांवर पाणी

RTGS चं टायमिंग - ग्राहकांसाठी ट्रान्झॅक्शन वेळ संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत करायचा निर्णय घेतलाय.  ही नवी वेळ 1 जूनपासून लागू झालीय.

NEFT काय असतं? - नॅशनल इलेक्ट्राॅनिक फंड ट्रान्सफर ( NEFT ) देशात बँकेद्वारे फंड ट्रान्सफर करण्याची व्यवस्था आहे. ग्राहक पैसे दुसऱ्या ब्रँचला किंवा कंपनीसा पाठवू शकतात. हल्ली सगळ्याच बँका ही सुविधा वापरतात.

रेपो रेट म्हणजे काय?

दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं कोल्हापूर विमानतळावर जंगी स्वागत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rbi
First Published: Jun 6, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...