Home /News /money /

मोठी बातमी : सरकारने रद्द केले 4.39 कोटी रेशन कार्ड; तुमचं नाव तर नाही ना, तपासून पाहा

मोठी बातमी : सरकारने रद्द केले 4.39 कोटी रेशन कार्ड; तुमचं नाव तर नाही ना, तपासून पाहा

One Nation One Ration Card Scheme: राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारने 2013 ते 2020 या काळात देशातील जवळपास 4.39 कोटी रेशन कार्ड रद्द केले आहेत.

    नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (Food and Public Distribution Department) एनएफएएसए (NFASA) अंतर्गत योग्य लाभार्थ्यांची ओळख करण्यासाठी 2013 पासूनचे 4.39 कोटी बनावट रेशन कार्ड रद्द केले आहेत. रद्द केलेल्या रेशन कार्डच्या बदल्याद योग्य लाभार्थी किंवा कुटुंबियांना नियमितपणे नवीन रेशन कार्ड जारी करण्यात आले आहेत. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) आधुनिक करण्यासाठी आणि याच्या कार्यात पारदर्शकता आणि कुशलता आणण्यासाठी अशाप्रकारची अनेक पावलं उचचली गेली आहेत. म्हणून रद्द केले रेशन कार्ड - रेशन कार्ड आणि लाभार्थ्यांच्या डेटाबेसचं डिजिटायझेशन करण्यासाठी, ते आधारशी जोडण्यासाठी, अपात्र किंवा खोट्या-बनावट रेशन कार्डची ओळख करण्यासाठी, डिजिटाईज केलेला डेटाची नक्कल रोखण्यासाठी आणि दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या किंवा मृत्यू झालेल्या प्रकरणांची ओळख केल्यानंतर, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारने 2013 ते 2020 या काळात देशातील जवळपास 4.39 कोटी रेशन कार्ड रद्द केले आहेत. लाभार्थ्यांची योग्य ओळख - पात्र लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबियांना नवीन रेशन कार्ड जारी करण्याचं काम सुरू आहे. कायद्यानुसार, प्रत्येत राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी परिभाषित कव्हरेजच्या संबंधित मर्यादेत हे काम केलं जात आहे. NFASA अंतर्गत टीपीडीएसद्वारे 81.35 कोटी लोकांना अतिशय कमी किंमतीत खाद्यान्न उपलब्ध करण्यात येत आहे. यात 2011 च्या जनगणनेनुसार, देशातील जनसंख्येच्या दोन तृतीयांश लोक आहेत. सध्या देशात 80 कोटीहून अधिक लोकांना केंद्राकडून जारी अतिशय कमी 1 रुपये, दोन रुपये आणि तीन रुपये प्रति किलोग्रॅम दराने दर महिन्याला NFASA अंतर्गत खाद्यान्न उपलब्ध केलं जात आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Ration card

    पुढील बातम्या