• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Ration Card: रेशन कार्ड संबंधित सेवा आता Online, असा घ्या घरबसल्या लाभ

Ration Card: रेशन कार्ड संबंधित सेवा आता Online, असा घ्या घरबसल्या लाभ

रेशन कार्ड शी संबंधित कोणतीही समस्या आता कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून सुटू शकणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : भारतात रेशन कार्ड (Ration card) हा एक महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. रेशन कार्ड मिळवणं आणि त्यातील नोंदींमध्ये बदल करणं हे एक दिव्यच असतं. साधा पत्ता बदलायचा असला तरीही अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घ्या, अर्ज भरत बसा असे अनेक व्याप करावे लागतात. शासकीय अन्नधान्य खरेदीसाठी याचा प्रामुख्यानं वापर केला जातो. प्रामुख्यानं देशातील गरीब आणि अल्पउत्त्पन्न गटातील कुटुंबांसाठी रेशन कार्ड अत्यावश्यक आहे. बऱ्याचदा रेशन कार्डवरील माहितीत काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्याबाबत तसेच रेशन कार्ड गहाळ झाल्यास डुप्लिकेट (Duplicate) किंवा नवे रेशन कार्ड कसं मिळवावं, रेशन कार्ड आधारशी कसं लिंक करावं, याची माहिती बऱ्याच जणांना नसते. असे प्रश्न उदभवल्यास नेमकं काय करावं, याबाबतची प्रक्रिया कशी असते याविषयीची माहिती नुकतीच डिजिटल इंडिया अभियानाच्या अधिकाऱ्यांनी (Digital India) ट्विटरच्या  (Twitter) माध्यमातून दिली आहे. रेशन कार्ड हे महत्त्वाच्या दस्तावेजांपैकी एक असल्यानं त्यावरील माहिती अपडेट असणं आवश्यक असतं. मात्र त्यातील त्रुटी कशा आणि कुठं दुरूस्त करायच्या याविषयीची माहिती डिजीटल इंडिया अभियानाच्या माध्यमातून नुकतीच ट्विटरद्वारे देण्यात आली. देशात सुमारे 23.64 कोटी रेशन कार्ड धारक आहेत. रेशन कार्डशी संबंधित सर्व सेवांचा लाभ संबंधित व्यक्ती नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून घेऊ शकतात. रेशन कार्डसंदर्भात तुम्ही नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर (CSC) जाऊन विविध सेवांचा लाभ घेऊ शकता, असं डिजीटल इंडियानं म्हणलं आहे. नोकरी बदलल्यानंतर ट्रान्सफर करायचे आहेत PF चे पैसे? जाणून घ्या सोपी पद्धत कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून रेशन कार्डधारक रेशन कार्डवरील माहिती अपडेट करू शकतात. तसेच येथे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक (Aadhar Card Link) करून दिलं जातं. रेशन कार्डची डुप्लिकेट प्रिंटही येथे मिळते. रेशन कार्डच्या उपलब्धतेची माहिती या केंद्रावर मिळू शकते. रेशन कार्डशी संबंधित तक्रारी या केंद्राच्या माध्यमातून दाखल करता येतात. रेशन कार्ड हरवल्यास नव्या रेशन कार्डसाठी अर्ज देखील या केंद्रावरून करता येऊ शकतो, अशी माहिती डिजीटल इंडियानं आपल्या अधिकृत ट्विटर  अकाउंटवरून दिली आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर सुविधेनं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. यामुळे 3.70 लाख सीएससीच्या माध्यमातून रेशनकार्ड संदर्भातील सेवा पुरवल्या जाणार आहेत. या सामंजस्य करारामुळं देशातील सुमारे 23.64 कोटी रेशन कार्ड धारकांना लाभ होण्याची शक्यता डिजीटल इंडियानं केलेल्या व्टिटमधून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्ड शी संबंधित कोणतीही समस्या आता कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून सुटू शकणार असल्यानं रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
  First published: