मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RateGain Travel शेअरची निराशाजनक लिस्टिंग; तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी काय करावं?

RateGain Travel शेअरची निराशाजनक लिस्टिंग; तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी काय करावं?

Rategain Travel Technologies चा इश्यू 17.41 पट सबस्क्राइब झाला. कंपनीचा इश्यू 7 डिसेंबरला उघडला आणि 9 डिसेंबरला बंद झाला. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव भाग 42.04 पट सबस्क्राईब झाला.

Rategain Travel Technologies चा इश्यू 17.41 पट सबस्क्राइब झाला. कंपनीचा इश्यू 7 डिसेंबरला उघडला आणि 9 डिसेंबरला बंद झाला. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव भाग 42.04 पट सबस्क्राईब झाला.

Rategain Travel Technologies चा इश्यू 17.41 पट सबस्क्राइब झाला. कंपनीचा इश्यू 7 डिसेंबरला उघडला आणि 9 डिसेंबरला बंद झाला. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव भाग 42.04 पट सबस्क्राईब झाला.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 17 डिसेंबर : ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी सोल्यूशन्स पुरवणारी रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीजचे (RateGain Travel Technologies) शेअर्स आज स्टॉक एक्स्चेंजवर इश्यू किमतीपेक्षा 15 टक्क्यांनी खाली लिस्टिंग झाले. कंपनीची इश्यू किंमत 425 रुपये आहे आणि तिचे शेअर्स 360 रुपयांवर लिस्टिंग (Share Listing Price) झाले आहेत. मात्र लिस्टिंगनंतर, रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये थोडी सुधारणा झाली आणि ते 383 रुपयांवर पोहोचले होते. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या (Sharte Market Expert) मते, येत्या ट्रेडिंग सत्रात रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीजचे शेअर्स आणखी खाली येऊ शकतात. अशा स्थितीत बाजारातील तज्ज्ञ सल्ला देतात की, स्टॉक सध्याच्या पातळीपासून वर गेला तर गुंतवणूकदारांनी बाहेर पडावे.

मिंटच्या म्हणण्यानुसार, बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे की, कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गाचा कंपनीवर वाईट परिणाम झाला आहे आणि येत्या काही दिवसांत तिच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होऊ शकते. कोरोनाव्हायरसचा नवीन वेरिएंट ओमिक्रॉन संपूर्ण जगभरात हाहाकार माजवत आहे. तज्ज्ञांचा सल्ला आहे की जर स्टॉक सध्याच्या पातळीवरून वर गेला तर सध्याच्या गुंतवणूकदारांनी त्यातून बाहेर पडून 300-322 रुपयांच्या पातळीवर पुन्हा गुंतवणूक करावी.

फिटनेसवर लक्ष देणाऱ्यांसाठी खास SBI Pulse card; वेलकम बेनिफिट म्हणून 4999 रुपयांचं स्मार्टवॉच फ्री

GCL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीला कोरोनाव्हायरस संसर्गाचा फटका बसला आहे. यापुढेही कंपनीच्या शेअर्सची विक्री होऊ शकते. त्यामुळे सल्ला आहे की सध्याच्या गुंतवणूकदारांनी वरचा प्राईजवर शेअरमधून बाहेर पडावे आणि 300-322 वर पुन्हा खरेदी करावी. तसेच शेअरसाठी 277 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्यास विसरू नका.

सबस्क्रिप्शन किती झालं होतं?

Rategain Travel Technologies चा इश्यू 17.41 पट सबस्क्राइब झाला. कंपनीचा इश्यू 7 डिसेंबरला उघडला आणि 9 डिसेंबरला बंद झाला. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव भाग 42.04 पट सबस्क्राईब झाला. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा राखीव हिस्सा 8.42 पट सबस्क्राईब झाला. तर किरकोळ गुंतवणूकदारांनी 8.08 पट बोली लावली होती. तर कर्मचार्‍यांसाठी राखीव हिस्स्यावर 1.37 पट बोली लावली गेली.

एका वर्षात पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 20 लाख; तुमच्याकडे आहे का?

हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधील देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस (SaaS) कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीजने 1335.74 कोटी रुपयांचा इश्यू जारी केला होता. यामध्ये नवीन ऑफर 375 कोटी रुपयांची होती आणि उर्वरित ऑफर फॉर सेल (OFS) होती. कंपनीचे गुंतवणूकदार आणि प्रमोटर ऑफर फॉर सेलमध्ये त्यांचे स्टेक विकत होते.

First published:

Tags: Investment, Money, Share market