बजेटआधी घसरले सोन्याचे दर, जाणून घ्या काय आहे नवा भाव...

बजेटआधी घसरले सोन्याचे दर, जाणून घ्या काय आहे नवा भाव...

नफावसुली आणि डॉलरची किंमत कमी झाल्याने सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. त्याशिवाय आज अमेरिकेचा स्वातंत्र दिवस असल्याने मुख्य बाजार बंद आहेत. परिणामी व्य़ापार कमी झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जुलैः बजेट येण्यासाठी एक दिवस राहिला असताना आज म्हणजे गुरुवारी सोन्याचे भाव घसरले आहेत. दिल्लीच्या सराफी बाजारात गुरुवारी एका तोळ्यामागे सोन्याच्या भावात 170 रुपयांची घसरण होऊन ते 34,210 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, चांदी 70 रुपयांनी खाली येऊन एका तोळ्यासाठी 38,580 किंमतीवर आलं आहे. औद्योगिक क्षेत्रांतील विक्री आणि विक्रेतांचा लिलाव कमी झाल्याने चांदीचे भाव घसरले असल्याचं मत विक्रेतायांकडून व्यक्त केले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार करता न्यूयॉर्कमध्येही सोन्याच्या दरात घसरण झालेली दिसली. सोन्याला प्रति औन्सला 1,413.46 डॉलर तर, चांदीचा प्रति औन्सला 15.26 डॉलरवर हा दर पोहोचला आहे.

Union Budget 2019 : 5 जुलैला मोदी सरकारपुढे असतील ही 5 आव्हानं

सोन्याचे भाव घटण्याचं कारण

नफावसुली आणि डॉलरची किंमत कमी झाल्याने सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. त्याशिवाय आज अमेरिकेचा स्वातंत्र दिवस असल्याने मुख्य बाजार बंद आहेत. परिणामी व्य़ापार कमी झाला.

आजचा सोन्याचा दर

अखिल भारतीय सराफी संघाच्या नुसार 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 170 ने खाली येऊन एका तोळ्यासाठी 34,040 वर आला आहे.

भारतीय रुपया 'या' मुस्लीम देशातही चालणार

चांदीमध्येही प्रचंड घसरण

तयार चांदीवर 70 रुपयांनी चांदीचा घसरला असून तोळ्यामागे त्याचा दर 38,580 रुपये इतका झाला आहे. तर लिलावामध्ये चांदीच्या नाण्याची किंमत 80,000 रुपये आणि शेकड्याच्या विक्रीचा दर 81,000 रुपये इतका आहे.

काल मात्र न्यूयॉर्कमध्ये डॉलरच्या दरानुसार सोन्यात मूल्यवाढ झाली होती. सोनं स्वस्त झाल्याने सराफी बाजारात स्थानिक दुकानदारांकडून सोन्याला असलेली मागणीमध्ये काल वाढ झाली होती. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या मूल्यवर्धनाची भर पडल्याचं चित्र काल दिसलं.

VIDEO:आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर

First published: July 5, 2019, 7:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading