मराठी बातम्या /बातम्या /मनी /'ती' पोस्ट माझी नाही, व्हायरल पोस्टबाबत ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचा खुलासा

'ती' पोस्ट माझी नाही, व्हायरल पोस्टबाबत ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचा खुलासा

रतन टाटा यांच्या नावाने एक बनावट पोस्ट सोशल मीडियात टाकण्यात आली असून ती व्हायरल झाली आहे. त्याबाबत टाटा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

रतन टाटा यांच्या नावाने एक बनावट पोस्ट सोशल मीडियात टाकण्यात आली असून ती व्हायरल झाली आहे. त्याबाबत टाटा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

रतन टाटा यांच्या नावाने एक बनावट पोस्ट सोशल मीडियात टाकण्यात आली असून ती व्हायरल झाली आहे. त्याबाबत टाटा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

    नवी दिल्ली, 4 सप्टेंबर : भारतीय उद्योगक्षेत्रातील एक नामवंत उद्योजक घराणे म्हणजे टाटा. मूल्य आणि तत्वांना प्राधान्य देऊन औद्योगिक साम्राज्य उभारणाऱ्या टाटा घराण्याने भारताची मान जगात उंचावली आहे. अशा टाटा उद्योग समूहाची धुरा यशस्वीपणे सांभाळून योग्य वेळी अध्यक्षपदावरून पायउतार होणारे ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) सध्या टाटा समूहाचे मानद अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सध्या रतन टाटा विविध स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून होतकरू उद्योजकांना पाठबळ देण्याचे काम करत आहेत. साधी राहणी उच्च विचारसरणीसाठी प्रसिद्ध असलेले रतन टाटा सोशल मीडियावरही सक्रिय असतात.

    त्यांच्या नावाने सोशल मीडियावर दारू विक्रीबाबत नुकतीच एक पोस्ट व्हायरल झाली असून, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे, मात्र ही पोस्ट खोटी असल्याचे रतन टाटा यांनी स्पष्ट केलं आहे. आधार कार्ड, दारू आणि सरकारी अनुदान यांचा उल्लेख असलेली ही पोस्ट फेसबुकवर आल्यानंतर झपाट्यानं सोशल मीडियावर व्हायरल झाली. रतन टाटा यांनी असं विधान केल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत होतं.

    ‘आधार कार्डच्या (Aadhar Card) आधारे दारू विक्री (Alcohol) केली पाहिजे. दारू विकत घेणाऱ्यासाठी अन्नधान्यासाठी मिळणारे सरकारी अनुदान (Subsidy) बंद केलं पाहिजे. कारण ज्यांच्याकडे दारू खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, ते नक्कीच अन्नधान्य खरेदी करू शकतात.’ अशी पोस्ट रतन टाटा यांच्या नावाने फेसबुकवर दिसून आली. शुक्रवारी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत रतन टाटा यांनी ही बनावट पोस्ट असून, आपण असे काहीही विधान केलेलं नसल्याचं स्पष्ट केलं.

    Gold Price Today: घसरण होऊनही सोन्याचे दर 47 हजारांपार, चांदीला मात्र झळाळी

    या बनावट पोस्टमधील सर्वांत मोठी चूक म्हणजे रतन टाटा यांच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे. यामध्ये त्यांचे नाव ‘रथन टाटा’ (Rathan Tata) असं लिहिलं आहे. त्यावरून ही पोस्ट कोणीतरी मुद्दाम त्यांच्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल करण्यासाठी शेअर केली असल्याचे स्पष्ट होते.

    रतन टाटा इन्स्टाग्रामवर सक्रिय असून, ते त्यांच्या दैनंदिन दिनक्रमाचे काही क्षण किंवा त्यांच्या आवडत्या आठवणींशी संबंधित पोस्ट करत असतात. इन्स्टाग्रामवर (Instagram) त्यांनी अलीकडे केलेली शेवटची पोस्ट म्हणजे एक फोटो होता. टाटा इस्टेट (Tata Estate) या स्टेशन वॅगन गाडीच्या शेजारी रतन टाटा आणि जेआरडी टाटा (JRD Tata) उभे आहेत, असा हा फोटो आहे. टाटा इस्टेट ही गाडी भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या इतिहासातील एक मैलाचा दगड होता. त्याची साक्ष देणारा हा फोटो अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. अशा अनेक आठवणी रतन टाटा इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. टाटांनीच खुलासा केल्यामुळे आता नेटिझन्सना या फेसबूक पोस्टबाबत स्पष्टता आली आहे.

    First published:

    Tags: Ratan tata