मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhujhunwala यांची टाटाच्या 'या' शेअरमधून दमदार कमाई, महिनाभरात संपत्तीत 1000 कोटींहून जास्त वाढ

Rakesh Jhujhunwala यांची टाटाच्या 'या' शेअरमधून दमदार कमाई, महिनाभरात संपत्तीत 1000 कोटींहून जास्त वाढ

टायटनचे शेअर्स महिनाभरात 1,946.10 रुपयांवरून 2,188.90 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या दरम्यान, त्यात 242.8 रुपयांची म्हणजेच 12.48 टक्क्यांची वाढ झाली आहे. टायटनचा शेअर गेल्या एका महिन्यात 13.10 टक्के वाढला आहे. यावर्षी स्टॉक 13.27% खाली ट्रेड करत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 17 जुलै : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये शुक्रवारी अनेक शेअर्समध्ये वाढ झाली. टायटन स्टॉक देखील त्यापैकी एक आहे. Titanचा शेअर शुक्रवारी बीएसईवर 2.84% वाढून 2,188.90 रुपयांवर बंद झाला. गेल्या सात ट्रेडिंग दिवसांमध्ये शेअर सुमारे 8.72% वाढला आहे. या कालावधीत हा शेअर 175.5 रुपयांनी वाढला आहे. 6 जुलै रोजी टायटनचा स्टॉक 2013.40 रुपयांवर होता. यामुळे शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी या शेअरमध्ये 784 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. या महिन्यात आतापर्यंत राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमधून सुमारे 1,088 कोटी कमावले आहेत. लाईव्ह हिंदुस्थान वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या महिन्यात आतापर्यंत टायटनचे शेअर्स 1,946.10 रुपयांवरून 2,188.90 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या दरम्यान, त्यात 242.8 रुपयांची म्हणजेच 12.48 टक्क्यांची वाढ झाली आहे. टायटनचा शेअर गेल्या एका महिन्यात 13.10 टक्के वाढला आहे. यावर्षी स्टॉक 13.27% खाली ट्रेड करत आहे. PM Svanidhi Yojana: गरीबांसाठी सरकारची ‘ही’ खास योजना, हमीशिवाय व्यवसायाला मिळतं कर्ज राकेश झुनझुनवाला यांचा टायटन कंपनीत हिस्सा टायटन कंपनी लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचा या टाटा कंपनीत मोठा हिस्सा आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,53,10,395 टायटनचे शेअर्स किंवा 3.98 टक्के शेअर्स आहेत तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 95,40,575 शेअर्स किंवा 1.07 टक्के शेअर्स आहेत. म्हणजेच झुनझुनवाला दाम्पत्याकडे टायटनचे एकूण 4,48,50,970 शेअर्स आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,48,50,970 शेअर्स आहेत. टाटा समूहाच्या शेअरमध्ये गेल्या सात ट्रेडिंग दिवसांमध्ये प्रति शेअर 175.5 रुपयांची वाढ झाली आहे. यानुसार राकेश झुनझुनवाला यांच्या मालमत्तेत अंदाजे (₹175.5 x 4,48,50,970) 786 कोटींची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे राकेश झुनझुनवाला यांनी जुलैमध्ये आतापर्यंत या स्टॉकमधून 1,088 कोटी रुपयांची कमाई केली आहे. Income Tax Return Filling: ITR भरताना चुकूनही करू नका ‘या’ 7 चुका, अन्यथा होईल मनस्ताप राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये 3.98% हिस्सा आहे. त्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळाचा 3.15% हिस्सा आहे. त्यानंतर Sbi-etf निफ्टी 50 चा 1.4% वाटा आहे. Icici प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा टायटनमध्ये एकूण 1.08% हिस्सा आहे. यानंतर राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 1.07% हिस्सा आहे. म्हणजेच झुनझुनवाला दाम्पत्याची टायटनमध्ये सर्वाधिक 5.05% हिस्सेदारी आहे.
First published:

Tags: Money, Share market, Tata group

पुढील बातम्या