मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांचा सर्वात आवडता होता 'हा' शेअर, ज्यांने अनेक गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Rakesh Jhunjhunwala यांचा सर्वात आवडता होता 'हा' शेअर, ज्यांने अनेक गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Rakesh Jhunjhunwala Death: टायटन कंपनीच्या शेअर्समुळे दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळाला आहे. गेल्या 10 वर्षाबद्दल बोलायचे झाले तर शेअर 11 पट वाढला आहे.

    मुंबई, 14 ऑगस्ट : राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील सर्वात विश्वासू असलेल्या टायटन कंपनीच्या शेअर्सने त्यांना मोठी साथ दिली. टायटन ही बर्‍याच काळापासून चांगली कामगिरी करणारी कंपनी आहे. कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या नेटवर्थमध्येही त्याचा मोठा वाटा आहे. 10 वर्षात 11 पट संपत्ती टायटन कंपनीच्या शेअर्समुळे दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळाला आहे. गेल्या 10 वर्षाबद्दल बोलायचे झाले तर शेअर 11 पट वाढला आहे. शेअरने सुमारे 988 टक्के परतावा दिला आहे. या अर्थाने, एखाद्याने स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते 11 लाख रुपये झाले असते. 10 वर्षांत शेअरची किंमत 225 रुपयांवरून 2448 रुपयांवर गेली आहे. 371 कोटींची गुंतवणूक, ५ वर्षांची प्रतीक्षा... राकेश झुनझुनवाला यांच्या अधुऱ्या स्वप्नांची कहाणी राकेश झुनझुनवाला सर्वात मोठे शेअरहोल्डर राकेश झुनझुनवाला यांच्याकेड टायटन शेअरमधील सर्वात मोठा हिस्सा आहे. एकट्या राकेश झुनझुवाला यांच्याकडे टायटनमध्ये 3.98% हिस्सा आहे. त्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळाचा 3.15% हिस्सा आहे. त्यानंतर Sbi-etf निफ्टी 50 1.4% हिस्सा आहे. Icici प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा टायटनमध्ये एकूण 1.08% हिस्सा आहे. यानंतर राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 1.07% हिस्सा आहे. म्हणजेच झुनझुनवाला दाम्पत्याची टायटनमध्ये सर्वाधिक 5,05% हिस्सेदारी आहे. राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ रेखा झुनझुनवाला सांभाळत आहे. राकेश झुनझुनवाला यांचं निधन राकेश झुनझुवाला यांचा पोर्टफोलिओ राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 37 शेअर्समध्ये सार्वजनिक होल्डिंग आहे. यामध्ये टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नाझारा टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्स हे त्यांचे प्रसिद्ध स्टॉक्स आहेत. यात त्यांची एकूण संपत्ती 19,695.3 कोटी रुपये आहे. यामध्ये टायटन कंपनी (7,879 कोटी), टाटा मोटर्स (1,474.4 कोटी), क्रिसिल (1,063.2 कोटी) हे त्यांचे सर्वात मोठी गुंतवणूक असलेले स्टॉक आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या