मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala : या ३ दिग्गजांसोबत डिनर करण्याचं स्वप्न शेवटपर्यंत राहिलं अपूर्ण

Rakesh Jhunjhunwala : या ३ दिग्गजांसोबत डिनर करण्याचं स्वप्न शेवटपर्यंत राहिलं अपूर्ण

झुनझुनवाला याचं एक स्वप्न मात्र शेवटपर्यंत अपूर्णच राहिलं. झुनझुनवाला यांना आपल्या घरी तीन दिग्गज लोकांना डिनरला बोलवण्याचं स्वप्न होतं.

झुनझुनवाला याचं एक स्वप्न मात्र शेवटपर्यंत अपूर्णच राहिलं. झुनझुनवाला यांना आपल्या घरी तीन दिग्गज लोकांना डिनरला बोलवण्याचं स्वप्न होतं.

झुनझुनवाला याचं एक स्वप्न मात्र शेवटपर्यंत अपूर्णच राहिलं. झुनझुनवाला यांना आपल्या घरी तीन दिग्गज लोकांना डिनरला बोलवण्याचं स्वप्न होतं.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई : राकेश झुनझुनवाला यांचं रविवारी सकाळी निधन झालं. ब्रिज कॅण्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेअर मार्केटमधील बादशाह हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी सांगितलेल्या शेअरवर लोक डोळे मिटून गुंतवणूक करायचे. त्यामुळे एक मोठा आधार गेल्याची भावना गुंतवणूकदारांची आहे. झुनझुनवाला याचं एक स्वप्न मात्र शेवटपर्यंत अपूर्णच राहिलं. झुनझुनवाला यांना आपल्या घरी तीन दिग्गज लोकांना डिनरला बोलवण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न मात्र अधूरं राहिलं. या तीन दिग्गजांमध्ये एक भारतीय देखील होता. त्यांनी या तीन दिग्गजांची नावं एक मुलाखती दरम्यान सांगितली होती. Rakesh Jhunjhunwala : 'वॉर्नर बफेट' राकेश झुनझुनवाला कोण होते? नेटवर्थ ते कुटुंब जाणून घ्या ५ Interesting Facts झुनझुनवाला यांनी मुंबईत १४ मजली इमारत ३७१ कोटी देऊन घेतली. त्यांनी या जागी आधी बंगला बांधण्याचं स्वप्न पाहिलं. पण नंतर त्यांनी ते पूर्ण न करता एक सुंदर मोठी इमारत जे ड्रीम हाऊस असेल असं बांधण्याचा निर्धार केला. १४ मजल्याची इमारत बांधण्याचा निर्धार केला. ते स्वत: १२ व्या मजल्यावर राहणार होते. यासाठी परवानगी प्रक्रियाही पूर्ण झाली होती. त्यांचं हे स्वप्न पूर्ण तर नक्की होईल मात्र ते पाहायला झुनझुनवाला मात्र नाहीत ही कुटुंबियांची भावना आहे. तर झुनझुनवाला यांना एक मुलाखती दरम्यान तुम्हाला जर घरी डिनरला बोलवायचं असेल तर कोणाला बोलवाल असा प्रश्न विचारा होता. 371 कोटींची गुंतवणूक, ५ वर्षांची प्रतीक्षा... राकेश झुनझुनवाला यांच्या अधुऱ्या स्वप्नांची कहाणी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, ब्रिटेनचे माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल आणि अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांना मी घरी डिनरसाठी बोलवलं असतं असं ते मुलाखतीमध्ये म्हणाले होते. एवढंच नाही तर त्यांना शेअर ट्रेडिंगमधून रिटायरमेंट घेऊन स्विमिंग शिकायचं होतं. त्यांना डान्स शिकायचा होता. त्यांना आपल्या मर्जीनं आयुष्य जगायचं होतं. त्यांना योगा करण्याचीही आवड होती. रविवारी सकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
First published:

पुढील बातम्या