मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांनी PM मोदींना सांगितलं चुरगळलेल्या शर्टचं सिक्रेट, काय होता तो किस्सा

Rakesh Jhunjhunwala यांनी PM मोदींना सांगितलं चुरगळलेल्या शर्टचं सिक्रेट, काय होता तो किस्सा

पंतप्रधान मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांच्यातला शर्टचा 'तो' किस्सा नक्की काय?

पंतप्रधान मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांच्यातला शर्टचा 'तो' किस्सा नक्की काय?

पंतप्रधान मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांच्यातला शर्टचा 'तो' किस्सा नक्की काय?

    मुंबई : बिग बुल ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला याचं आज निधन झालं. त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अनेक दिग्गजांनी अर्पण केली. यावेळी एक किस्सा चर्चेत आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रकेश झुनझुनवाला यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्या फोटोवरून हा किस्सा चर्चेत आला. मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात झुनझुनवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांच्या शर्टची खूप चर्चा झाली होती. राकेश झुनझुनवाला यांनी चुरगळलेला शर्ट घातल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. Rakesh Jhunjhunwala : 'वॉर्नर बफेट' राकेश झुनझुनवाला कोण होते? नेटवर्थ ते कुटुंब जाणून घ्या ५ Interesting Facts पंतप्रधान मोदींनी त्यांनी या चुरगळलेल्या शर्टमागचं खरं कारण सांगितलं. राकेश झुनझुनवाला घरातून निघताना शर्टला कडक इस्त्री करून निघाले होते. त्यानंतर हा शर्ट चुरगळला. त्याला मी काय करू शकतो असं त्यांनी या भेटीत म्हटलं होतं. खरं तर कारण हे होतं की तो शर्टच तसा होता. मला असा शर्ट घातल्याने कोणता फरक पडणार आहे. मला कोणता क्लाइंट किंवा कस्टमर तयार करायचा आहे? असं म्हणत त्यांनी हे हसण्यावारी नेलं होतं. पंतप्रधान मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांच्या भेटीचा हा किस्सा खूप चर्चेत राहिला होता. आगामी काळात भारतात १० टक्क्यांनी मार्केटमध्ये प्रगती होईल असंही त्यांनी सांगितलं होतं. राकेश झुनझुनवाला... शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळख, काय आहे कारण? राकेश झुनझुनवाला हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना किडनीचा आजार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रविवारी सकाळी पुन्हा रुग्णालयात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या