मराठी बातम्या /बातम्या /मनी /

राकेश झुनझुनवाला यांचा 'या' कंपनीत गुंतवणुकीचा शेवटचा निर्णय फायदेशीर, शेअरमध्ये 44% वाढ

राकेश झुनझुनवाला यांचा 'या' कंपनीत गुंतवणुकीचा शेवटचा निर्णय फायदेशीर, शेअरमध्ये 44% वाढ

सिंगर इंडियामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय राकेश झुनझुनवाला यांनी गेल्या आठवड्यातच घेतला होता. मंगळवारी त्यांच्या कंपनी रेअर एंटरप्रायझेसने सिंगर इंडिया बल्क डीलमध्ये 10 टक्के शेअर्स खरेदी केले.

  मुंबई, 17 ऑगस्ट : शेअर बाजारातील बिगबुल राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर, त्यांच्या कंपनी रेअर (RARE) एंटरप्रायझेसने मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 रोजी BSE वर लिस्टेड असलेल्या सिंगर इंडिया या कंपनीचे शेअर्स खरेदी केले. तेव्हापासून सिंगर इंडियाच्या शेअरमध्ये सुरू असलेली तेजी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मंगळवारी शेअर 20 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आणि बुधवारी देखील, स्टॉक 19 टक्क्यांच्या जवळ जात आहे. दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर 44 टक्क्यांनी वाढला आहे. सिंगर इंडियामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय हा राकेश झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीचा शेवटचा निर्णय असल्याचे मानले जात आहे. रविवारी, 14 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचे निधन झाले. मंगळवारी त्यांच्या कंपनी रेअर एंटरप्रायझेसने सिंगर इंडिया बल्क डीलमध्ये 10 टक्के शेअर्स खरेदी केले. लाईव्ह मिंटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सरकारकडून आधार कार्डवर मिळतंय 5 लाखांचं कर्ज, व्हायरल मेसेजबाबत सरकारने काय म्हटलं? रेअर एंटरप्रायझेसने सिंगर इंडियामध्ये 42,50,000 शेअर्स विकत घेतले, जो 10 टक्के हिस्सा आहे. सिंगर इंडियामध्ये रेअर एंटरप्रायझेसच्या गुंतवणुकीपासून, स्टॉकमध्ये प्रचंड वाढ होत आहे. बुधवारीही शेअर 20 टक्क्यांनी वधारला. मंगळवारी हा शेअर 69.15 रुपयांवर बंद झाला आणि बुधवारी 82.95 रुपयांवर पोहोचला. केवळ दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर 44 टक्क्यांनी वाढला आहे.

  Multibagger Share: 9 रुपयांचा शेअर 3700 रुपयांवर, गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 4 कोटी

  राकेश झुनझुनवाला हे बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीला पसंती देत असत. टायटन, टाटा मोटर्स आणि डेल्टा कॉर्प या कंपन्यांमध्ये त्यांच्या कंपनीची गुंतवणूक आहे. अनेक स्टार्टअप्समध्येही त्यांनी गुंतवणूक केली होती. पॉलिसी बझार, मेट्रो ब्रँड आणि नझारा टेक्नॉलॉजी यांसारख्या कंपन्या ज्यात त्यांनी गुंतवणूक केल. या कंपन्यां गेल्या वर्षी शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Investment, Money, Share market

  पुढील बातम्या