मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' स्टॉकला BUY रेटिंग, किती होऊ शकतो फायदा?

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' स्टॉकला BUY रेटिंग, किती होऊ शकतो फायदा?

फोर्टिस हेल्थकेअरच्या जुलै-सप्टेंबर, 2021 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,19,50,000 शेअर्स किंवा 4.23 टक्के हिस्सा आहे.

फोर्टिस हेल्थकेअरच्या जुलै-सप्टेंबर, 2021 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,19,50,000 शेअर्स किंवा 4.23 टक्के हिस्सा आहे.

फोर्टिस हेल्थकेअरच्या जुलै-सप्टेंबर, 2021 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,19,50,000 शेअर्स किंवा 4.23 टक्के हिस्सा आहे.

    मुंबई, 26 डिसेंबर : फोर्टिस हेल्थकेअरचा शेअर (Fortis Healthcare Stock) गेल्या एका महिन्यापासून 270 रुपये ते 290 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेडिंग करत आहे. तो 303.80 रुपयांच्या ऑलटाईम हाय जवळ आहे आणि 294.50 रुपयांच्या हाय लेव्हलवर बंद झाला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या होल्डिंग कंपनीच्या शेअरला 290 रुपयांच्या बंद आधारावर ब्रेकआउट मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर त्यात चांगली तेजी पाहायला मिळू शकते. त्यामुळे, गुंतवणूकदार (Investors) सध्याच्या पातळीवर हा स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करू शकतात. 31 डिसेंबरआधी 'हे' काम करुन घ्या, अन्यथा सीज होईल बँक अकाऊंट शेअरची टार्गेट प्राईज लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, Choice Broking चे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांनी गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. फोर्टिस हेल्थकेअरच्या स्टॉकमध्ये 290 रुपयांच्या पातळीवर नवीन तेजीची अपेक्षा आहे. या ब्रेकआउटनंतर, हेल्थकेअर स्टॉकमध्ये चांगली तेजी दिसून येईल. त्यामुळे पोझिशन घेणाऱ्या गुंतवणूकदारांनी हा स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो आहे, तर शॉर्ट टर्म गुंतवणूकदार हा स्टॉक 290 ते 300 रुपयांचे टार्गेट ठेवून 260 रुपयांचा स्टॉप लॉस लावून सध्याच्या किमतींवर खरेदी करू शकतात. 'या' मल्टीबॅगर स्टॉकमुळ गुंतवणूकदार बनले करोडपती; 97 पैशांचा स्टॉक 194 रुपयांवर 335 रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा प्रवीण इक्विटीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि संस्थापक मनोज दालमिया यांनी, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना स्टॉक होल्ड करण्याचा आणि ब्रेकआउटची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने आरोग्य सेवेमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याने हा स्टॉक दीर्घकाळासाठी ठेवता येईल. विविध संबंधित उपक्रमांसह पुढे जात आरोग्य सेवा क्षेत्राला खूप महत्त्व देण्याची योजना आहे. सध्या शेअर कन्सॉलिडेट होत आहे. 300 रुपयांच्या वर ब्रेकआउट झाल्यास स्टॉक 335 रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा करू शकतो. राकेश झुनझुनवाला यांचे शेअरहोल्डिंग फोर्टिस हेल्थकेअरच्या जुलै-सप्टेंबर, 2021 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,19,50,000 शेअर्स किंवा 4.23 टक्के हिस्सा आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या