मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे हा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्टॉक, तुम्ही गुंतवणूक केलीये का?

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे हा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्टॉक, तुम्ही गुंतवणूक केलीये का?

Federal Bank Share: राकेश झुनझुनवाला यांची होल्डिंग असणारा असाच एक शेअर 100 रुपयांपेक्षा कमी स्तरावर आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये त्यात 10 टक्क्यांची तेजी येण्याची शक्यता आहे. यामुळे हा शेअर 110 रुपयांच्या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: अनेकदा शेअर मार्केटमध्ये (Investment in Share Market) गुंतवणूक करताना, पैसे बुडतील असा विचार केला जातो. हे खरं आहे की शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची आहे पण अभ्यास करून एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास फायदाही चांगलाच आहे. अभ्यास करताना तुम्ही रिटेल गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओचा (rakesh jhunjhunwala portfolio) आधार घेऊ शकता. अनेक छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांना यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला मिळू शकतो.

राकेश झुनझुनवाला यांची होल्डिंग असणारा असाच एक शेअर 100 रुपयांपेक्षा कमी स्तरावर आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये त्यात 10 टक्क्यांची तेजी येण्याची शक्यता आहे. यामुळे हा शेअर 110 रुपयांच्या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे.

हा स्टॉक आहे Federal Bank चा आणि सध्या हा शेअर 98 रुपयांच्या आसपास आहे. चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगडिया म्हणतात की लवकरच फेडरल बँकेत नवीन ब्रेकआउट पाहता येईल. या शेअरला 92 रुपयांच्या आसपास मजबूत सपोर्ट आहे. क्लोजिंग आधारावर रु. 100-110 ची पातळी गाठल्यावर यात नवीन ब्रेकआउट दिसेल आणि अल्पावधीत हा शेअर रु. 110 च्या आसपास दिसेल. सुमीत बगडिया म्हणतात की या शेअरमध्ये रु. 92 च्या स्टॉप लॉससह रु. 110 च्या लक्ष्यासाठी खरेदी करता येईल

हे वाचा-Bank of Baroda देत आहे स्वस्तात घरखरेदीची संधी! आजच आहे Mega e-Auction

SMC ग्लोबल सिक्युरिटीजचे सौरभ जैन यांच्या मते, फेडरल बँक ही मिडसाइझ साउथ इंडिया स्थित बँक आहे. बँकेने नुकतेच जाहीर केले आहे की त्यांचा मालमत्तेवरील परतावा पुढील दोन वर्षांत सध्याच्या 0.92 टक्क्यांवरून 1.25 टक्क्यांपर्यंत वाढेल. सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेची कॉस्ट ऑफ फंड देखील कमी झाली आहे, हे बँकेच्या भविष्यातील व्यवसायासाठी चांगले आहे. कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाल्यामुळे, बँकिंग क्षेत्रात जोरदार तेजी अपेक्षित आहे. ज्यामुळे फेडरल बँकेला फायदा होईल आणि हा स्टॉक देखील मध्यम ते दीर्घ कालावधीत नवीन उच्चांक गाठताना दिसेल.

हे वाचा-2000% चा जबरदस्त रिटर्न! 33 रुपयांचा हा मल्टिबॅगर स्टॉक पोहोचला 721 रुपयांपार

राकेश झुनझुनवाला यांची फेडरल बँकेत होल्डिंग

राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची फेडरल बँकेतील होल्डिंग सप्टेंबरच्या तिमाहीत 3.65 टक्के होती. या तुलनेत राकेश झुनझुनवाला यांची त्याआधीच्या तिमाहीत म्हणजेच जून तिमाहीत बँकेतील होल्डिंग केवळ 2.78 टक्के होती.

First published:

Tags: Money, Share market