Home /News /money /

Rakesh Jhunjhunwala यांचा पोर्टफोलिया यावर्षी 50 टक्क्यांनी मजबूत, तरीही इतर दिग्गजांपेक्षा मागेच

Rakesh Jhunjhunwala यांचा पोर्टफोलिया यावर्षी 50 टक्क्यांनी मजबूत, तरीही इतर दिग्गजांपेक्षा मागेच

राकेश झुनझुनवाला यांचा 24,000 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ चालू वर्षात 50 टक्क्यांनी वाढला आहे, जो गेल्या वर्षी 28 टक्क्यांनी वाढला होता. त्यांचा परतावा आणखी एक अनुभवी गुंतवणूकदार आशिष धवन यांच्यापेक्षा चांगला होता.

    मुंबई, 16 डिसेंबर : कॅलेंडर वर्ष 2021 हे भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) उत्तम ठरले आहे. मजबूत रिटेल इनफ्लोज आणि कॉर्पोरेट अर्निंगच्या पार्श्वभूमीवर बेंचमार्क Nifty 50 या वर्षी आतापर्यंत 23 टक्क्यांनी वाढला आहे. या रॅलीची चांगली गोष्ट म्हणजे या काळात सामान्य किरकोळ गुंतवणूकदारांपासून ते राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या सारख्या बड्या गुंतवणूकदारांनीही चांगला परतावा मिळवला आहे. निफ्टी 500 ने 2021 मध्ये निफ्टी 50 पेक्षा चांगला परतावा देत 29 टक्क्यांपर्यंत चढला आहे. इकॉनॉमिक टाईम्समधील एका अहवालानुसार, गुंतवणूकदारांच्या सर्व गटात चांगलं प्रदर्शन करणाऱ्या समूहात High Networth Individuals यांचा समावेश होता आणि यात दिग्गज गुंतवणूकदारांचा (Investors) समावेश आहे. गुंतवणूकदार त्यांच्या दशकांच्या अनुभवावर, अर्थव्यवस्थेची चांगली समज आणि कमाईच्या चांगल्या वेळेवर अवलंबून होते. 10 लोकप्रिय HNIs चा 2.40 लाख कोटी पोर्टफोलिओ ट्रेंडलाइनवर उपलब्ध डेटानुसार, 2021 मध्ये (14 डिसेंबरपर्यंत), 10 लोकप्रिय HNI ने एकूण 2.4 लाख कोटी रुपयांच्या पोर्टफोलिओ साईजवर 100 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवला आहे. या प्रख्यात गुंतवणूकदारांमध्ये सर्वात लोकप्रिय राकेश झुनझुनवाला यांचाही समावेश आहे, ज्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम होते. विशेष म्हणजे 10 सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्यांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. राकेश झुनझुनवाला यांचा 24,000 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ चालू वर्षात 50 टक्क्यांनी वाढला आहे, जो गेल्या वर्षी 28 टक्क्यांनी वाढला होता. त्यांचा परतावा आणखी एक अनुभवी गुंतवणूकदार आशिष धवन यांच्यापेक्षा चांगला होता. या काळात धवन यांचा पोर्टफोलिओ 40 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षाच्या मध्यात झुनझुनवाला अव्वल स्थानी पोहोचले होते. परंतु गेल्या काही महिन्यांत त्याच्या पोर्टफोलिओमधील मेटलच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या कामगिरीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. तुमचा पगार 15 हजारहून कमी असेल तर लगेच इथे रजिस्ट्रेशन करा; 'या' योजनेचा फायदा मिळेल सीता कुमारी यांच्या संपत्तीत 182 टक्क्यांनी वाढ या यादीत टॉपवर असलेल्या सीता कुमारी या कदाचित 10 लोकांमध्ये कमी ओळखले जाणारे नाव आहे. हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स आणि जिंदाल पॉली फिल्म्समध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे कुमारी यांचा पोर्टफोलिओ 182 टक्क्यांनी वाढून 545 कोटी रुपयांवर पोहोचला. सुनील सिंघानिया, दलाल स्ट्रीटवरील अनेक फंड व्यवस्थापकांचे मार्गदर्शक आणि अबॅकस अॅसेट मॅनेजरचे संस्थापक, 2021 मध्ये 133 टक्के परताव्यासह दुसरे राहिले आहेत. सिंघानिया यांच्याकडे 2,400 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ आहे. चौथ्या क्रमांकावर विजय केडिया मोठे गुंतवणूकदार विजय केडिया यांचा पोर्टफोलिओ 123 टक्क्यांनी वाढून 543 कोटी रुपयांवर पोहोचला आणि अनुभवी गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांच्यासोबत ते चौथ्या स्थानावर पोहोचले. अग्रवाल यांना डेल्टा कॉर्प आणि इंटेलेक्ट डिझाइनचा फायदा झाला, तर केडियाला तेजस नेटवर्क्स आणि वैभव ग्लोबलकडून चांगली कमाई केली होती. FD Credit Card: फिक्स्ड डिपॉझिटवरही घ्या क्रेडिट कार्ड; प्रोसेस पाहा, तुमचं काम होईल सोपं 125 टक्के रिटर्नसह डॉली खन्ना तिसऱ्या क्रमांकावर डॉली खन्ना 125 टक्के रिटर्न मिळवून तिसर्‍या क्रमांकावर आहेत. खन्ना बाजारात खूप सक्रिय आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये पॉलिप्लेक्स, नितीन स्पिनर्स आणि एनडीटीव्ही या शेअर्सचा समावेश आहे. राधाकिशन दमाणी (70 टक्के), आशिष कचोलिया (59 टक्के) आणि अनिल गोयल (98 टक्के) हे या यादीत इतर गुंतवणूकदार होते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या