मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांचे टाटाच्या 'या' शेअरमुळे 10 मिनिटात 318 कोटींचं नुकसान

Rakesh Jhunjhunwala यांचे टाटाच्या 'या' शेअरमुळे 10 मिनिटात 318 कोटींचं नुकसान

Titan कंपनीच्या शेअरची किंमत आज 2,336 रुपयांवर उघडली आणि सकाळी 9:25 वाजता प्रति शेअर 2,283.65 रुपयांच्या पातळीवर घसरली. ही घसरण ओपनिंग बेलनंतर अवघ्या 10 मिनिटांनी झाली.

Titan कंपनीच्या शेअरची किंमत आज 2,336 रुपयांवर उघडली आणि सकाळी 9:25 वाजता प्रति शेअर 2,283.65 रुपयांच्या पातळीवर घसरली. ही घसरण ओपनिंग बेलनंतर अवघ्या 10 मिनिटांनी झाली.

Titan कंपनीच्या शेअरची किंमत आज 2,336 रुपयांवर उघडली आणि सकाळी 9:25 वाजता प्रति शेअर 2,283.65 रुपयांच्या पातळीवर घसरली. ही घसरण ओपनिंग बेलनंतर अवघ्या 10 मिनिटांनी झाली.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 17 डिसेंबर : शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) करणाऱ्यांचं बिग बुल अर्थात राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhujhunwala) यांच्या पोर्टफिलोओवर लक्ष असतं. भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. Nifty आज सुमारे 200 अंकांनी घसरला आहे, तर बीएसई Sensex आज 800 हून अधिक अंकांनी घसरला आहे. शेअर बाजारातील पडझडी दरम्यान राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhujhunwala portfolio) यांना बाजार उघडल्यानंतर 10 मिनिटांतच जवळपास 318 कोटींची नुकसान झालं आहे. टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये (Titan Share Price) हे नुकसान झाले.

टायटन कंपनीच्या शेअरची किंमत आज 2,336 रुपयांवर उघडली आणि सकाळी 9:25 वाजता प्रति शेअर 2,283.65 रुपयांच्या पातळीवर घसरली. ही घसरण ओपनिंग बेलनंतर अवघ्या 10 मिनिटांनी झाली.

राकेश झुनझुनवाला यांचा टायटन कंपनीत हिस्सा

टायटन कंपनीच्या शेअरची किंमत काल NSE वर 2,357.25 रुपये प्रति शेअरवर बंद झाली आणि आज बाजार उघडण्याच्या 10 मिनिटांनंतर तो 2,283.65 रुपयांपर्यंत घसरला, यादरम्यान तो प्रति शेअर 73.60 रुपयांनी घसरला.

फिटनेसवर लक्ष देणाऱ्यांसाठी खास SBI Pulse card; वेलकम बेनिफिट म्हणून 4999 रुपयांचं स्मार्टवॉच फ्री

राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचा या टाटा कंपनीत हिस्सा आहे. टायटन कंपनीच्या जुलै ते सप्टेंबर 2021 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 3,37,60,395 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण जारी केलेल्या पेड-अप भांडवलाच्या 3.80 टक्के आहे.

त्याचप्रमाणे रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 95,40,575 शेअर्स किंवा 1.07 टक्के हिस्सा आहे. अशारितीने राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 4,33,00,970 शेअर्स आहेत.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 4,33,00,970 शेअर्स आहेत. बाजार उघडल्यानंतर 10 मिनिटांत प्रति शेअर 73.60 रुपयांचा तोटा झाला. टाटाच्या या स्टॉकमधील घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 318 कोटी ( 73.6 x 4,33,00,970) रुपयांनी कमी झाली आहे.

शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex मध्ये 889 अंकांची पडझड, तर Nifty 17 हजारांच्या खाली

टायटन कंपनीच्या शेअरची किंमत

मात्र किरकोळ पोझिशनिंग गुंतवणूकदारांसाठी ही घसरण चांगली खरेदीची संधी म्हणून बाजार निरीक्षक पाहतात. मिंटच्या मते, चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया म्हणाले, टायटन कंपनीच्या शेअर्सला 2200 च्या पातळीवर मजबूत सपोर्ट आहे. सध्याच्या पातळीवर हा स्टॉक 2350 ते 2400 च्या शॉर्ट टर्म टार्गेटसाठी खरेदी करा आणि 2200 पातळीवर स्टॉप लॉस ठेवा.

First published:

Tags: Investment, Money, Share market, Tata group