मराठी बातम्या /बातम्या /मनी /

TATA च्या दोन शेअरमुळे Rakesh Jhunjhunwala यांना मोठा फटका, काही मिनिटात 230 कोटींचं नुकसान

TATA च्या दोन शेअरमुळे Rakesh Jhunjhunwala यांना मोठा फटका, काही मिनिटात 230 कोटींचं नुकसान

शेअर बाजारातील विक्रीच्या दबावाखाली राकेश झुनझुनवाला यांना टाटा समूहाच्या त्यांच्या 2 पसंतीच्या शेअरमध्ये अवघ्या 10 मिनिटांतच सुमारे 230 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. टायटन कंपनी (Titan Company) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) शेअरमध्ये हे नुकसान झालं आहे.

शेअर बाजारातील विक्रीच्या दबावाखाली राकेश झुनझुनवाला यांना टाटा समूहाच्या त्यांच्या 2 पसंतीच्या शेअरमध्ये अवघ्या 10 मिनिटांतच सुमारे 230 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. टायटन कंपनी (Titan Company) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) शेअरमध्ये हे नुकसान झालं आहे.

शेअर बाजारातील विक्रीच्या दबावाखाली राकेश झुनझुनवाला यांना टाटा समूहाच्या त्यांच्या 2 पसंतीच्या शेअरमध्ये अवघ्या 10 मिनिटांतच सुमारे 230 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. टायटन कंपनी (Titan Company) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) शेअरमध्ये हे नुकसान झालं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 20 डिसेंबर : कमकुवत जागतिक संकेत आणि ओमिक्रॉनच्या (Omocron Variant) जगभरातील कहराचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. आज शेअर बाजारात (Share Market Falls) प्रचंड घसरण दिसत आहे. NSE निफ्टी 16500 च्या दरम्यान ट्रेड करताना दिसत आहे. दुसरीकडे, सेन्सेक्समध्ये 1250 हून अधिक अंकांची घसरण झाली आहे आणि तो 55,600 च्या दरम्यान ट्रेड करताना दिसत आहे. शेअर बाजारातील विक्रीच्या दबावाखाली राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना टाटा समूहाच्या त्यांच्या 2 पसंतीच्या शेअरमध्ये अवघ्या 10 मिनिटांतच सुमारे 230 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. टायटन कंपनी (Titan Company) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) शेअरमध्ये हे नुकसान झालं आहे.

टायटन कंपनीचे शेअर्स आज NSE वर 22.70 रुपये प्रति शेअरच्या घसरणीसह उघडले. शुक्रवारी, तो 2280.40 रुपयांवर बंद झाला, तर आज सकाळी 09.25 च्या सुमारास शेअर 2241.10 रुपयांच्या आसपास दिसला. बाजार उघडल्यानंतर 10 मिनिटांच्या आत या शेअरमध्ये शुक्रवारच्या बंद किमतीपासून प्रति शेअर 39.30 रुपयांची घसरण झाली.

Share Market Crash : शेअर बाजारातील घसरणीचं नेमकं कारण काय? कोणते घटक ठरले कारणीभूत

त्याचप्रमाणे टाटा मोटर्सचा शेअर आज NSE वर 10.30 रुपये प्रति शेअरच्या घसरणीसह उघडला. शुक्रवारी शेअर 470.20 रुपयांवर बंद झाला होता. बाजार उघडल्यानंतर 10 मिनिटांत शेअर 15.90 रुपयांनी घसरून 454.30 च्या पातळीवर पोहोचला.

राकेश झुनझुनवाला यांच्या टायटन कंपनीतील होल्डिंगवर नजर टाकल्यास, जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीत राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांचीही या कंपनीत होल्डिंग आहे. या कालावधीत, राकेश झुनझुनवाला यांची होल्डिंग 3,37,60,395 इक्विटी शेअर्स किंवा 3.80 टक्के होती, तर रेखा झुनझुनवाला यांची होल्डिंग 95,40,575 इक्विटी शेअर्स किंवा 1.07 टक्के होती. कंपनीतील दोघांचे एकत्रित स्टेक 4,33,00,970 इक्विटी शेअर्स आहेत.

Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही

अशाप्रकारे, राकेश झुनझुनवाला यांची टाटा मोटर्समधील होल्डिंग 3,67,50,000 इक्विटी शेअर्स किंवा त्याच कालावधीत 1.11 टक्के होती. आज बाजारात पहिल्या 10 मिनिटांत टायटनचे शेअर्स प्रति शेअर 39.30 रुपयांनी घसरले आहेत, त्यामुळे राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्या झालेल्या तोट्यावर नजर टाकली, तर या दोघांचे मिळून सुमारे 170 कोटी रुपयांचे (39.30 x 4,33,00,970) नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे आजच्या पहिल्या 10 मिनिटांत टाटा मोटर्सचे शेअर्स 15.90 रुपयांनी घसरले. या आधारे कॅलक्युलेशन केले असता, राकेश झुनझुनवाला यांना या काळात टाटा मोटर्स शेअरमध्ये 60 कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता एकूण तोटा पाहता राकेश झुनझुनवाला यांना टाटा मोटर्स आणि टायटनच्या या दोन्ही शेअर्समध्ये (₹170 कोटी + ₹60 कोटी) म्हणजेच 230 कोटींचे नुकसान झाले आहे.

Investment Tips: 29 रुपयांच्या स्टॉकमध्ये कमाईची संधी, तीन महिन्यात 45 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील या शेअर्सवर भाष्य करताना, चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगडिया म्हणतात की टायटनचा स्टॉक 2150 ते 2300 रुपयांच्या श्रेणीत दिसत आहे. जर या शेअरने 2300 रुपयांची पातळी तोडली तर त्यात आणखी वाढ दिसून येईल. त्याचप्रमाणे, जर टाटा मोटर्सचा समभाग 430-460 श्रेणीच्या वर गेला तर आपल्याला आणखी चढ-उताराची गती दिसेल.

First published:

Tags: Money, Share market, Tata group