Home /News /money /

राकेश झुनझुनवाला यांचं पाच दिवसात 1000 कोटींचं नुकसान; 'हे' दोन शेअर ठरले कारणीभूत

राकेश झुनझुनवाला यांचं पाच दिवसात 1000 कोटींचं नुकसान; 'हे' दोन शेअर ठरले कारणीभूत

fbgvtbtg

    मुंबई, 3 जुलै : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात (Share Market) जोरदार विक्री होत आहे. रुपयाची कमजोरी आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारात केलेली विक्री यामुळेही बाजारावर दबाव येत आहे. यामुळे काही क्वालिटी स्टॉकवरही परिणाम झाला आहे. शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आणि बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन (Titan), स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स (Start Health and Allied Insurance Company)कंपनीच्या शेअर्सचा समावेश आहे. यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. राकेश झुनझुनवाला यांना या शेअर्सच्या प्रचंड विक्रीमुळे गेल्या आठवड्यात 1,000 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात टायटनच्या शेअरची किंमत 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये 2,053.50 रुपयांवरून 1,944.75 रुपये प्रति शेअरवर घसरली. अशाप्रकारे टायटनच्या शेअरमध्ये प्रति शेअर 108.75 रुपयांची घसरण झाली. त्याच वेळी, स्टार हेल्थच्या शेअरची किंमत 531.10 रुपयांवरून 475.90 रुपयांपर्यंत घसरली. गेल्या आठवड्यात प्रति शेअर 55.20 रुपयांची घसरण नोंदवली गेली. राकेश झुनझुनवाला यांचे किती शेअर्स? जानेवारी-मार्च 2022 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांची टायटनमध्ये होल्डिंग 3,53,10,395 शेअर्स आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची होल्डिंग 95,40,575 शेअर्स आहे. अशाप्रकारे झुनझुनवाला दाम्पत्याकडे टायटनचे एकूण 4,48,50,970 शेअर्स आहेत. त्याचवेळी राकेश झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थचे 10,07,53,935 शेअर्स आहेत. गेल्या आठवड्यात राकेश झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचे सुमारे 485 कोटी रुपये आणि स्टार हेल्थचे 555 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. 1 जुलै 2022 रोजी NSE वर टायटनचे शेअर्स 4.95 रुपयांच्या किरकोळ वाढीसह 1946.20 रुपयांवर बंद झाले. त्याचप्रमाणे, 1 जुलै 2022 रोजी, NSE वर स्टार हेल्थचे शेअर्स 14.75 रुपये किंवा 3.02 टक्क्यांनी घसरून 475.90 रुपयांवर बंद झाले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या