• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या Nazara Tech च्या नफ्यात Q2 मध्ये 10 टक्के वाढ

राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या Nazara Tech च्या नफ्यात Q2 मध्ये 10 टक्के वाढ

Nazara Technologies चं आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत उत्पन्न 30 टक्क्यांनी वाढून 261 रुपये झाले. जे गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 200 कोटी रुपये होते.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑक्टोबर : देशातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची गुंतवणूक कंपनी Nazara Technologies ने शुक्रवारी 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या कालावधीत, कंपनीच्या नफ्यात 9.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 14.5 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 13.2 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात 18 टक्क्यांची वाढ झाली असून गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत उत्पन्न 110 कोटी रुपये होते ते वाढून 129 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत उत्पन्न 30 टक्क्यांनी वाढून 261 रुपये झाले. जे गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 200 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा नफा 28 कोटी रुपये होता. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला 8.3 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बँकेत शुन्य बॅलेन्स असतानाही काढू शकणार पैसे, काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर... Nazara Technologies ग्रुपचे सीईओ मनीष अग्रवाल यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीचे उत्पन्न 260.8 कोटी रुपये आणि EBIDTA 49.6 कोटी रुपये आहे. या कालावधीत, कंपनीच्या कमाईत वार्षिक आधारावर 30 टक्के वाढ झाली आणि EBIDTA वार्षिक 700 टक्क्यांनी वाढला. आम्ही या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एक मजबूत एक्झिक्युशन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. अनुकूल परिस्थितीमुळे पुढील सहामाहीतही कंपनीची कामगिरी मजबूत राहील. हे आहेत 5 धमाकेदार Focused Mutual Funds, एका वर्षात दिले 80 टक्के रिटर्न! पुढे ते म्हणाले की कंपनीच्या वाढीस ऑरगॅनिक आणि इन ऑरगॅनिक अशा दोन्ही प्रकारचा पाठिंबा मिळेल. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीच्या उत्पन्नात वार्षिक आधारावर 35-40 टक्के वाढ होईल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, मार्जिनमध्ये वार्षिक आधारावर 13-15 टक्क्यांची वाढ होऊ शकते. शुक्रवारी Nazara टेकचा स्टॉक NSE वर 2 टक्क्यांनी घसरून 2,659.80 रुपयांवर बंद झाला.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: