Home /News /money /

Rakesh Jhunjhunwala यांनी Titan शेअरमधील भागिदारी वाढवली, काय आहे कारण?

Rakesh Jhunjhunwala यांनी Titan शेअरमधील भागिदारी वाढवली, काय आहे कारण?

राकेश झुनझुनवाला यांनी Titan कंपनीतील त्यांचा हिस्सा 3.80% (3,37,60,395 शेअर्स) वरून 4.02% (3,57,10,395 शेअर्स) पर्यंत वाढवला आहे. तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटनबाबत कोणताही बदल केलेला नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 14 जानेवारी : शेअर बाजारातील बिग बुल अर्थात राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala ) यांनी टायटन कंपनीतील (Titan Company Share Price) आपली हिस्सेदारी आणखी वाढवली आहे. टायटन हा त्याच्या पोर्टफोलिओमधील सर्वात मोठा स्टॉक आहे. जर आपण डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीच्या डेटावर नजर टाकली तर राकेश झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीमधील त्यांचा हिस्सा 4.02 टक्क्यापर्यंत वाढवला आहे. ताज्या माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला यांनी या टाटा ग्रुप कंपनीतील त्यांचा हिस्सा 3.80% (3,37,60,395 शेअर्स) वरून 4.02% (3,57,10,395 शेअर्स) पर्यंत वाढवला आहे. तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटनबाबत कोणताही बदल केलेला नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 3.80 टक्के शेअर्स होते. Budget 2022 : अर्थसंकल्पात काळानुरुप झालेले बदल आणि महत्त्वाच्या गोष्टी, तुम्हाला माहिती आहेत का चांगल्या निकालाची शक्यता बाजार विश्लेषक म्हणतात की टायटनने एक प्रभावशाली उद्योग म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ही कंपनी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. ज्वेलरी मार्केटवर कंपनीची पकड खूप मजबूत आहे आणि आगामी काळातही त्यात तेजी दिसून येईल. Budget 2022: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे नेमकं काय? बजेटआधी सादर केला जातो Economic Survey एमके ग्लोबलला अपेक्षा आहे की डिसेंबर 2021 च्या तिमाही निकालांमध्ये कंपनीने 9,500 कोटी रुपयांच्या महसुलात 30 टक्के वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत सराफा विक्रीतील 340 कोटी रुपये वगळता ही वाढ 37 टक्के राहण्याची शक्यता आहे. कंपनी 8 फेब्रुवारीच्या आसपास निकाल जाहीर करेल. शुक्रवारी 14 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता टायटनच्या शेअरची किंमत 2598.50 रुपये होती. यापूर्वी 7 जानेवारी रोजी या शेअरने 2687.25 रुपयांचा ऑल टाईम हाय गाठला होता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या