Home /News /money /

राकेश झुनझुनवाला यांची 'या' शेअरमधून तीन महिन्यात 1540 कोटींची कमाई, तुमच्याकडे आहे का शेअर?

राकेश झुनझुनवाला यांची 'या' शेअरमधून तीन महिन्यात 1540 कोटींची कमाई, तुमच्याकडे आहे का शेअर?

Rakesh Jhunjhunwala यांची Titan मधील होल्डिंग पाहिल्यास, सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांची एकत्रित शेअरहोल्डिंग 4.87 टक्के किंवा 4,33,00,970 इक्विटी शेअर्स होती.

    मुंबई, 1 जानेवारी : टायटन कंपनी (Titan Company) हा राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा आवडता स्टॉक आहे जो त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट आहे. राकेश झुनझुनवाला यांनी टाटा समूहाच्या (Tata Group) या स्टॉकवर प्रचंड विश्वास दाखवला आहे आणि कोविड-19 महामारीच्या (Covid 19) आव्हानात्मक काळातही ते या स्टॉकमध्ये राहिले आहेत आणि हा विश्वास त्यांना फायदा देत आहे. राकेश झुनझुनवाला यांनी 3 महिन्यांत टायटन स्टॉकमधून जबरदस्त कमाई केली आहे. गेल्या 3 महिन्यांत, हा स्टॉक 2161.85 (30 सप्टेंबर 2021 रोजी NSE बंद किंमत) वरून 2517.55 रुपये (31 डिसेंबर 2021 रोजी NSE बंद किंमत) पर्यंत वाढला आहे. त्यामुळे राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत 1540 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांची टायटनमधील होल्डिंग पाहिल्यास, सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांची एकत्रित शेअरहोल्डिंग 4.87 टक्के किंवा 4,33,00,970 इक्विटी शेअर्स होती. निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा, जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवली जर तुम्ही टायटन कंपनीच्या शेअरच्या प्राईजची (Titan share price) हिस्ट्री पाहिली तर, 30 सप्टेंबर 2021 रोजी हा स्टॉक NSE वर 2161.85 रुपयांवर बंद झाला. तर 31 डिसेंबर 2021 रोजी NSE वर हा स्टॉक 2517.55 रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे, गेल्या 3 महिन्यांत टायटनचा शेअर 355.70 रुपयांनी वाढला आहे. खऱ्या अर्थाने Happy New Year! 100 रुपयांनी घटले LPG गॅस सिलेंडरचे दर, या ग्राहकांना होणार फायदा भविष्यात शेअरची वाटचाल कशी असू शकेल? टायटनची तेजी शॉर्ट टर्ममध्ये कायम राहण्याची शक्यता असल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. सध्याच्या पातळीवरही या शेअरमध्ये खरेदी करता येईल. चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगाडिया सांगतात की, टायटन कंपनीचे शेअर्स सध्याच्या पातळीवरही खरेदी करता येतील. येत्या 15 ते 25 दिवसांत हा शेअर 2700 रुपयांची पातळी दाखवू शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Share market, Tata group

    पुढील बातम्या