Home /News /money /

राजकुमार रावचे घर म्हणजे त्याचा अविस्मरणीय भूतकाळ आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंबच

राजकुमार रावचे घर म्हणजे त्याचा अविस्मरणीय भूतकाळ आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंबच

VIDEO: राजकुमार राव आणि त्याचा प्रिय कुत्रा गागा तुम्हाला त्याच्या घराची सैर घडवून आणत आहेत.

    'एशियन पेंट्स व्हेअर द हार्ट इज' या लोकप्रिय वेब शोच्या सीझन 4 मध्ये प्रेक्षकांना भारतातील काही मोठ्या सेलिब्रिटींचे घर, त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करणारे घरातील खास इंटेरिअर आणि त्यातून त्यांचे कौटुंबिक विचार आणि घराविषयीचे प्रेम याची एक अनोखी झलक पाहायला मिळणार आहे. या सीझनच्या सहाव्या एपिसोडमध्ये राजकुमार राव प्रेक्षकांना त्याच्या मुंबईतील निवासस्थानी आमंत्रित करणार आहे. या घराचा प्रत्येक कोपरा या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्याचा क्लास आणि क्रिएटिव्हिटीचे दर्शन देतो. या घरातील प्रत्येक गोष्टी राजकुमार रावचे घर कसे परिपूर्ण बनतात हे तुम्हाला पाहायला मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अंतर ठेवत असताना तो आयुष्यात कशाप्रकारे स्थिरता आणि शांतता राखतो याचा अंदाजही तुम्हाला त्यातून येईल. राजकुमार रावचे घर आणि त्यातील क्रिएटिव्हिटी त्याचे घराविषयीचे प्रेम दर्शवतात. गुडगावच्या घरी जेथे एकत्रित कुटुंबातील 16 सदस्य राहायचे, तेथे सुरु झालेल्या त्याच्या आयुष्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतातील एक सर्वोत्तम कलाकार म्हणून स्थान निर्माण केलेल्या राजकुमार रावच्या घरात त्याच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब दिसून येते. त्याचे स्प्लिट लेव्हल अपार्टमेंट दोन भागात विभागले आहे. घराचा वरील भाग मनोरंजन आणि व्यवसायाशी संबंधित आहे. तर खालील भाग अधिक जिव्हाळ्याचा वैयक्तिक गोष्टींसाठी तयार केला आहे. घराचे डिझाईन अतिशय काळजीपूर्वक बनवण्यात आले आहे. डिझाईनचा विचार करताना एक्झॉटिक आणि सॉफेस्टिकेटेड डिझाईनचा मिलाप केल्याचे दिसून येते. त्यात लक्षपूर्वक तयार करण्यात आलेली कलाकूसर, लक्षवेधी फिक्स्चर आणि कलर पॅटर्न यांचा समावेश होते. फर्निशिंग इलेक्टिक डिझाइन घटकांशी जुळते, त्यामुळे घरातील प्रत्येक जागेची शैली आणि वातावरण वेगळे दिसते. त्या गोष्टी राजकुमार रावच्या मनाचा ठाव घेतात आणि खरोखरच हे एक मोठ्या मनाच्या व्यक्तीचे घर असल्याचे दाखवून देतात. राजकुमार राव आणि त्याचा प्रिय कुत्रा गागा तुम्हाला त्याच्या घराची सैर घडवून आणत आहेत, व्हिडिओ येथे पाहा. शंकर महादेवन, तमन्ना भाटिया, अनिता डोंगरे, स्मृती मंधना, प्रितीक कुहाड आणि भावंड, शक्ती आणि मुक्ती मोहन यांच्यासारख्या व्यक्तीही तुम्हाला ‘एशियन पेंट्स व्हेअर हार्ट इज सीजन 4’ मध्ये भेटायला येणार आहे. ते या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला त्यांच्या घराची सैर घडवणार आहेत. आपल्या घराची सैर घडवतानाच ते त्यांच्या घराच्या खास आठवणी आणि भावनिक बंध आपल्याशी शेअर करणार आहेत. आधीच्या ‘एशियन पेंट्स व्हेअर द हार्ट इज’च्या आधीच्या तीन सीझनमधील व्हिडिओजना जवळपास 250 दशलक्ष व्ह्यू मिळाले आहेत. आता आम्ही सीझन 4 मध्येही घराविषयीच्या अशाच काही गोष्टींसह सज्ज आहोत!
    First published:

    पुढील बातम्या