मराठी बातम्या /बातम्या /मनी /जनरल तिकिटाचा हा स्पेशल नियम तुम्हाला माहितीये का? अवश्य घ्या जाणून

जनरल तिकिटाचा हा स्पेशल नियम तुम्हाला माहितीये का? अवश्य घ्या जाणून

जनरल तिकिटाचे नियम

जनरल तिकिटाचे नियम

जनरल तिकिटाची व्हॅलिडिटी केवळ काही तासांसाठी असते आणि त्या वेळेनंतर कोणी ट्रेनमध्ये चढले तर त्याला दंड भरावा लागू शकतो.

मुंबई, 23 मे : ट्रेन हा भारतातील वाहतुकीचा सर्वाधिक वापरला जाणारा आणि सर्वांचा आवडता रेल्वे मार्ग आहे. कमी भाडे आणि प्रवासाची सोय यामुळे लोक ट्रेनने प्रवास करणं पसंत करतात. जनरल बोगीतून तिकीट रिझर्व्ह न करता प्रवास केला जाऊ शकतो. साधारणपणे लोक कमी अंतराच्या प्रवासाठी जनरल डब्यातूनच प्रवास करतात. जवळपास प्रत्येक ट्रेनमध्ये जनरल डबे असतात. पण, रेल्वेच्या जनरल तिकिटाचा महत्त्वाचा नियम तुम्हाला माहिती नसेल. हा नियम जनरल तिकिटाच्या व्हॅलिडिटीसंदर्भात आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जनरल तिकिटाची व्हॅलिटिडी देखील असते. तिकीट खरेदी केल्यानंतर तुम्ही निर्धारित वेळेत त्याचा वापर करून प्रवास करू शकता.

दिवसभर अनरिजर्व्ड तिकिटांवर प्रवास करण्याची फसवणूक थांबवण्यासाठी रेल्वेने (भारतीय रेल्वे) प्रवास सुरू करण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे. यापूर्वी वेळेचे बंधन नसल्यामुळे तिकिटांचा गैरवापर होत होता. त्यामुळे रेल्वेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. हे टाळण्यासाठी रेल्वेने 2016 मध्ये जनरल तिकिटांची व्हॅलिटिडी देखील ठरवून घेतली.

ट्रेनमध्ये काही निळे तर काही लाल रंगाचे कोच का असतात? दोघांत काय फरक?

जनरल तिकीट 3 तासांसाठी व्हॅलिड आहे

भारतीय रेल्वेचे नियम सांगतात की, जर तुम्हाला 199 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला जनरल तिकीट काढल्यानंतर 3 तासांच्या आत ट्रेन पकडावी लागेल. तर 200 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी 3 दिवस आधी जनरल तिकीट काढता येईल. जर एखाद्या प्रवाशाने 199 किलोमीटरपेक्षा कमी अंतराच्या प्रवासासाठी तिकीट काढले तर त्याला ज्या स्थानकावर जायचे आहे त्या स्थानकावर जाणारी पहिली ट्रेन सुटेपर्यंत किंवा तिकीट खरेदी केल्यानंतर 3 तासांच्या आत प्रवास सुरू करावा लागेल.

ट्रेन सुटली तरी डोंट वरी, तिकिटाचे पैसे परत करेल रेल्वे; रिफंड मिळवण्याची सोपी प्रोसेस

भरावा लागेल दंड

आता एखाद्या प्रवाशाने 199 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी खरेदी केलेल्या तिकिटावर तीन तासांनंतर प्रवास केला, तर ते तिकीटविना तिकीट समजून दंड आकारण्याचा अधिकार रेल्वेला आहे. जर प्रवास 3 तास सुरू झाला नाही तर प्रवासी तिकीट रद्द करू शकत नाही किंवा इतर कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही.

First published:
top videos

    Tags: Indian railway, Railway, Train