News18 Lokmat

रेल्वे प्रवासात भरा फक्त 49 पैसे आणि मिळवा 'हा' फायदा

हा फायदा कन्फर्म आणि आरएसी तिकीटधारकांनाच मिळेल. वेटिंग लिस्टला याचा फायदा मिळणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 08:35 PM IST

रेल्वे प्रवासात भरा फक्त 49 पैसे आणि मिळवा 'हा' फायदा

मुंबई, 11 एप्रिल : तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांना 10 लाख  रुपयांचा इन्शुरन्स देते. ट्रॅव्हल इन्शुरन्स घ्यायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून असतं. पण यासाठी तुम्हाला फक्त 49 पैसे खर्च करावे लागतील.

कसा घ्यायचा ट्रॅव्हल इन्शुरन्स

तुम्ही IRCTC द्वारा ट्रेन तिकीट बुक कराल, तर तुम्हाला 10 लाखांचा विमा उपलब्ध होतो. तुम्ही IRCTC च्या वेबसाईटवर कधीही तिकीट बुक केलंत तर Travel Insurance चा पर्याय येईल. तुम्ही तो स्वीकारण्यासाठी तुम्हाला 49 पैसे द्यावे लागतील.Loading...


कोणाला मिळणार इन्शुरन्सचा फायदा?

हा फायदा कन्फर्म आणि आरएसी तिकीटधारकांनाच मिळेल. वेटिंग लिस्टला याचा फायदा मिळणार नाही. कारण ही तिकिटं कन्फर्म नाही झाली तर ते आपोआप रद्द होऊ शकतं. ट्रॅव्हल विम्याचा फायदा 5 वर्षांहून लहान मुलांना मिळणार नाही.

किती मिळणार क्लेम?

भरपाई किती मिळणार, हे दुर्घटनेवर अवलंबून असेल. 5 भागांमध्ये याची वाटणी झालीय. दुर्घटनेत अपंगत्व आणि मृत्यू झाला तर 10 लाख रुपये मिळतात. पूर्ण अपंगत्व असेल तर 10 लाख रुपये मिळतात. अपंगत्व कमी असेल तर 7.50 लाख रुपये मिळतात. मृत्यू झाला तर शव नेण्यासाठी 10 हजार रुपये मिळतात.

असे भरा नाॅमिनीचे डिटेल्स

IRCTC मधून तिकीट बुक केल्यानंतर मोबाईलवर SMS किंवा ई मेल द्वारे नाॅमिनीची माहिती देण्याची लिंक मिळते. त्यावर क्लिक केलं तर तुम्ही वेबसाइटवर जाऊन डिटेल्स भरू शकता. त्यात नाव, वय आणि तुमचं नातं ही माहिती भरायची.


VIDEO : सोलापूर एमआयडीसीत भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 08:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...