रेल्वेत आहेत नव्या व्हेकन्सीज्, 28 जूनपर्यंत 'या' पदांसाठी करा अर्ज

रेल्वेत आहेत नव्या व्हेकन्सीज्, 28 जूनपर्यंत 'या' पदांसाठी करा अर्ज

रेल्वेनं नोकऱ्यांसाठी अर्ज मागवलेत. जाणून घ्या या व्हेकन्सीबद्दल

  • Share this:

मुंबई, 10 जून : सेंट्रल रेल्वेनं सीनियर सेक्शन ऑफिसर आणि इतर पदांसाठी अर्ज मागवलेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारानं 28 जून 2019पर्यंत अर्ज करावेत, असं सांगण्यात आलंय.

रेल्वे व्हेकन्सीजबद्दल

पोस्ट - सीनियर सेक्शन आॅफिसर आणि इतर 10 पदं

या पदासाठी फक्त अकाउंट डिपार्टमेंटचे निवृत्त रेल्वे कर्मचारी अर्ज करू शकतात. याशिवाय री अॅरेंजमेंटमध्ये  ज्याचं वय 65 वर्षापर्यंत आहे, ते या पदासाठी अर्ज करू शकतात.

GST काउन्सिलची बैठक 20 जूनला, 'या' वस्तू होणार स्वस्त

या पदासाठी ज्या उमेदवाराची निवड केली जाईल, त्याचं काम आवडलं नाही तर 1.12.2019 आधी कामावरून काढू शकतील, हे स्वातंत्र्य रेल्वेनं स्वत:कडे ठेवलंय. त्यानंतर त्या उमेदवाराला पुन्हा अर्ज करता येणार नाही. SRRS/LARGESS च्या खाली निवृत्त झालेल्यांची भरती होणार नाही.

पुढच्या 48 तासांत मुसळधार पावसामुळे 'या' गावांना धोका

या उमेदवारांना नेहमीच्या ड्युटी अवर्समध्येच काम करावं लागेल. कामाप्रमाणे या तासात बदल होऊ शकतो. सुट्टी आणि वीकली आॅफ इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळतील.

री - अॅरेंजमेंटप्रमाणे भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना CL, RH, APL, Sick leave मिळणार नाही. अनुपस्थिती असेल तर पगार कापला जाईल.

मुंबईत चार जणांचा जीव घेणारा खड्डा अजूनही तसाच !

रेल्वेनं ही वेगळी योजना आणलीय. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ते फिट असतील तर पुन्हा रेल्वे सामावून घेतेय. यामुळे अनुभवी माणसं रेल्वेला मिळतील. निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा थोडी वर्ष काम करण्याची संधी रेल्वे देतेय.

VIDEO : लंडनमध्ये मॅच पाहायला पोहोचला विजय मल्ल्या, लोकांनी केलं असं स्वागत

First published: June 10, 2019, 8:42 PM IST

ताज्या बातम्या