रेल्वेनं 'या' पदांसाठी काढल्यात 95 व्हेकन्सीज्, 30 जूनच्या आधी करा अर्ज

रेल्वेनं 'या' पदांसाठी काढल्यात 95 व्हेकन्सीज्, 30 जूनच्या आधी करा अर्ज

ही पूर्ण वेळ नोकरी आहे. काॅन्ट्रॅक्टवर आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून : दक्षिण रेल्वेनं आॅनलाइन 95 व्हेकन्सी काढली आहे. ही पदं आहेत एक्झिक्युटिव्ह असिस्टंट्स (इंग्लिश)/डेटा एंट्री ऑप्रेटर्स, डिजिटल ऑफिस असिस्टंट्स (इंग्लिश). ही पूर्ण वेळ नोकरी आहे. काॅन्ट्रॅक्टवर आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवार नोकरीसाठी अर्ज 30 जून 2019च्या आधी करू शकतात. आॅनलाइन अर्ज करण्यासाठी rrcmas.in वर लाॅग इन करा.

वयाची मर्यादा

एक्झिक्युटिव्ह असिस्टंट्स (इंग्लिश)/डेटा एंट्री ऑप्रेटर्स, डिजिटल ऑफिस असिस्टंट्स (इंग्लिश)साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 1 जानेवारी 2019पर्यंत 18 ते 28 वर्षापर्यंत हवं. SC, ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट आहे. OBC ला 3 वर्षांची सूट, तर दिव्यांग व्यक्तींना 10 वर्षांची सूट आहे.

लवकरच लाँच होतेय तुमच्याशी बोलणारी कार

शैक्षणिक योग्यता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे BCA/B.Sc कम्प्युटर सायन्स/ IT किंवा MS Office 2010 किंवा  later version मध्ये discipline plus Microsoft Office Specialist Certificationची पदवी असायला हवी.

UIDAI ची खास भेट, 'इथे' तयार करून मिळेल आधार कार्ड

पद आणि जागा

एक्झिक्युटिव्ह असिस्टंट्स (इंग्लिश)/डेटा एंट्री ऑप्रेटर्स, डिजिटल ऑफिस असिस्टंट्स (इंग्लिश)साठी 95 जागा आहेत.

अर्जाची फी

एक्झिक्युटिव्ह असिस्टंट्स (इंग्लिश)/डेटा एंट्री ऑप्रेटर्स, डिजिटल ऑफिस असिस्टंट्स (इंग्लिश)साठी अर्ज करणाऱ्यांसाठी वेगवेगळी फी आहे. UR,OBC उमेदवारासाठी 500 रुपये फी आहे. त्यात 400 रुपये स्क्रीनिंग टेस्टसाठी उपस्थित राहणाऱ्यांना परत दिले जातील.

SC/ST/PWD/महिला/ आर्थिकदृष्ट्या मागास/ अल्पसंख्याक उमेदवाराची फी 250 रुपये आहे. स्क्रीनिंग टेस्टसाठी उपस्थित उमेदवारांना पूर्ण फी परत केली जाईल.

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज

निवड प्रक्रिया

उमेदवाराला कम्प्युटर आणि इंग्लिश चांगलं आलं पाहिजे. निवड written/online स्क्रीनिंग टेस्टमधून होईल. written/online स्क्रीनिंग टेस्टमध्ये 100 आॅब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न इंग्रजीत असतील. स्क्रीनिंग टेस्टसाठी दीड तास मिळेल.

प्रश्नपत्रिकेतले प्रश्न Computers, English, Basic Quantitative Skill आणि  जनरल नॉलेज संबंधी असतील.

VIDEO : मंत्रिमंडळात रिपाइंसाठी गोड बातमी, आठवलेंनी केली भावी मंत्र्याची घोषणा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2019 08:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading