रेल्वेत 'ही' सुविधा झाली महाग, आता द्यावे लागतील 100 रुपये

रेल्वेत 'ही' सुविधा झाली महाग, आता द्यावे लागतील 100 रुपये

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रवासात येणाऱ्या अडचणींकडे रेल्वे गांभीर्यानं बघतेय.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : आता चालत्या ट्रेनमध्ये तुमची तब्येत बिघडली आणि डाॅक्टरांना बोलवावं लागलं तर तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील. रेल्वे बोर्डानं ही व्यवस्था पूर्ण भारतीय रेल्वेत सुरू केलीय. स्टेशनवर मिळणारा प्राथमिक उपचार घेण्यासाठी डाॅक्टरांची फी आणि औषधांसाठी 100 रुपये द्यावे लागतील.

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चालत्या ट्रेनमध्ये ही सुविधा सुरू केली होती. यात प्रवासात प्रवाशांची तब्येत बिघडली तर ट्विटर आणि फोनच्या माध्यमातून मदत मिळू शकते. पण काही दिवस खोट्या तक्रारींमध्ये वाढ झालीय. म्हणजे काही वेळा हातपाय दुखतात अशा छोट्या तक्रारींसाठी मदत मागायला सुरुवात झाली होती. म्हणूनच वैतागून रेल्वेनं हा निर्णय घेतलाय.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रवासात येणाऱ्या अडचणींकडे रेल्वे गांभीर्यानं बघतेय. अनेकदा एखाद्या गरोदर स्त्रीला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर ट्रेन थांबवण्यात आली होती. उपचारानंतरच ट्रेन सोडली गेली.

पहिल्यांदा 20 रुपये प्रति रुग्ण फी नक्की केली होती

उपचारानंतर रेल्वेनं पहिल्यांदा 20 रुपये फी नक्की केली होती. ही रक्कम इतकी कमी होती की रेल्वेचे डाॅक्टरही ते घेत नव्हते. त्यासाठी रेल्वेकडून त्यांना काही मिळतंही नव्हतं. इकडे ट्विटरवर रेल्वे डाॅक्टरांनी तक्रार केली. डाॅक्टर मग ओपीडी सोडून स्टेशनवर ट्रेनची वाट बघत उभे असलेले दिसायचे. यामुळे हाॅस्पिटलमधल्या रुग्णावरच्या उपचारांमध्येही अडथळे यायचे.

आता ईएफटी बुकिंगवर पावती

स्टेशन अधिकाऱ्यांप्रमाणे प्रवासी प्रवासात डाॅक्टरांची मदत घेत असतील तर आता 100 रुपयांची पावती दिली जाईल. ही पावती रेल्वेचा टीटी देईल.

भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी, निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण; VIDEO व्हायरल

Tags:
First Published: Apr 23, 2019 04:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading